Shivsena UBT : ZP निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा नौटंकी, पक्षाचा व्हीप झुगारत अर्ज केला अन् माघारही घेतली..भाजपची पुन्हा सरशी!

Chhatrapati Sambhajinagar zp Election : छत्रपती संभाजीनगर ZP निवडणुकीत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेची नौटंकी पाहायला मिळाली आहे. तर यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बजावलेल्या व्हीपलाच केराची टोपली दाखवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Ambadas Danve And Sandipan Bhumare Chhatrapati Sambhajinagar zp politics
Ambadas Danve And Sandipan Bhumare Chhatrapati Sambhajinagar zp politicsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अंबादास दानवे यांनी दिलेला व्हिप झुगारून कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  2. शिंदे गटाकडे मदत मागितल्यानंतरही त्यांनी शेवटी अर्ज मागे घेतला.

  3. या संपूर्ण घडामोडीत भाजपचीच सरशी झाल्याचे दिसून आले.

ZP Election News : झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तोंडघशी पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विषय समिती सभापती निवडणुकीतही नौटंकी करण्यात आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पक्षाच्या 9 सदस्यांसाठी सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत कोणत्याच पक्षाला मतदान करायचे नाही, असा व्हीप जारी केला होता. परंतु तो झुगारत अंबादास दानवे यांचेच विश्वासू सदस्य कृष्णा पाटील डोणगावंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

एवढेच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेकडे मदतीची मागणी केली. खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेऊन डोणगांवकर यांनी त्यांना गळ घातली. पण माघारीच्या मुदतीत अर्ज मागे घेतला आणि ही नौटंकी संपुष्टात आली. एकूणच विषय समिती सभापती पदाच्या निवडीतही भाजपचीच सरशी झाल्याचे दिसून आले. शिंदेंची शिवसेना या निवडणुकीतही तटस्थच राहिल्याने चार पैकी तीन सभापती भाजप तर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदा प्रमाणेच सभापती पदाची निवडही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर आता सभापती पदावरही भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बहुमताची स्पष्ट आकडेवारी आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आल्याने सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून वरून पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता.

Ambadas Danve And Sandipan Bhumare Chhatrapati Sambhajinagar zp politics
Shivsena UBT Kolhapur: उद्धव ठाकरेंचा नव्या चेहऱ्यांवर विश्वास, शहर प्रमुखपदांची जबाबदारी उमद्या तरुणांवर...

मात्र, निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने त्यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. भाजपकडून मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांना संधी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के यांचा समावेश आहे. तसेच अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत सचिन गरड यांनाही संधी मिळाली आहे. दुपारी दोन वाजेनंतर अधिकृत विजय घोषित होणार आहे.

दरम्यान, कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येत भाजपविरोधात अध्यक्षपदासाठी समीकरणे जुळवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.

Ambadas Danve And Sandipan Bhumare Chhatrapati Sambhajinagar zp politics
Shivsena UBT : खासदारांनी 'शॉक' देताच उद्धव ठाकरे पुन्हा 'ॲक्शन मोड'मध्ये; आता महाराष्ट्रातील पक्षवाढीसाठी रणनीती

FAQs :

1. व्हिप कोणी जारी केला होता?
अंबादास दानवे यांनी व्हिप जारी केला होता.

2. व्हिपला विरोध कोणी केला?
कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी व्हिप झुगारला.

3. त्यांनी कोणती कारवाई केली?
सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

4. नंतर काय घडलं?
माघारीच्या मुदतीत त्यांनी अर्ज मागे घेतला.

5. या घटनेचा परिणाम काय झाला?
भाजपची पुन्हा सरशी झाली आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com