Assembly Election 2024 : शिंदेंच्या 'या' उमेदवाराच्या शपथपत्रात 16 प्रकारच्या गंभीर चुका, निवडणूक आयोगाने दिला 24 तासांचा वेळ

Abdul Sattar Election Affidavit : महायुती (Mahayuti) सरकारमधील अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील विविध त्रुटींवरून सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण सत्तार यांनी उमेदवाराने अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल 16 प्रकारच्या गंभीर चुका असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून सत्तार यांना 24 तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे.

महायुतीचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील (Sillod Assembly Constituency) उमेदवार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात मालमत्ता, चारचाकी वाहन आणि दागिन्यांशी संबंधित खोटी माहिती दिली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Eknath Shinde News
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : ठरलं..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतूनच शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार

या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतली असून 24 तासांत याबाबतची माहिती देण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्तारांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार होताच आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड येथील निवडणूक अधिकाऱ्यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिल्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत सत्तार यांची डोकेदुखी वाढली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महायुती (Mahayuti) सरकारमधील अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील विविध त्रुटींवरून सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Eknath Shinde News
Vidhansabha Election : प्री-पोल सर्व्हेत कोणाचे पारडे जड; महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार ?

त्यानी अब्दुल सत्तारांनी शपथपत्रांमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत त्यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे. याच तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने सत्तार यांना 24 तासांचा वेळ देत योग्य माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com