Nilanga News: आगामी निवडणुका पाहता राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी नेते मंडळींनी सध्या भर दिला आहे. मात्र, असे असतानाच ठाकरे गटाला धक्यावर धक्के बसत आहेत. मुंबईतील माजी नगरसेवकांसह शेकडो शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता लातूर जिल्ह्यातही ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
ठाकरे गटाचे लातूर माजी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पण पदावरून काढल्याने त्यांची नाराजी दूर झाली नाही. अखेर त्यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत ते आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लातूरमध्ये खिंडार पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या 36 वर्षापासून सेनेचा भगवा पताका खांद्यावर घेऊन पक्ष वाढीसाठी अविरतपणे झटणारे पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे शिवाजीराव माने यांच्याकडे पाहिले जाते. शिवसैनिक, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशा विविध पदावर त्यांनी कार्य केलेले आहे.
जून 2019 मध्ये शिवाजीराव माने यांच्याकडे शिवसेनेच्या लातूर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आता त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून अचानक हटवल्यामुळे त्यांची त्यांची नाराजी लपून राहिली नाही. आता त्यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, एस.टी.कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकट बिरादार, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, माजी तालुका प्रमुख इश्वर पाटील यांसह देवणी, लातूर, औसा, निलंगा येथील शेकडो शिवसैनिक सोमवारी नागपूर (Nagpur) येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.
(Edited by-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.