Dharashiv News: धाराशिवमधील धक्कादायक प्रकार; महिला आघाडी जिल्हाध्यक्षांच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे- पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली.
Maneesha Rakhunde Patil
Maneesha Rakhunde Patil Sarkarnama

Marathi News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे- पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.

या घटनेने खळबळ उडाली असून सुदैवाने मनीषा रांखुंडे या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे त्या बालंबाल बचावल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आरोपीवर काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे. (Dharashiv News)

Maneesha Rakhunde Patil
MP Amol Kolhe Vs Ajit Pawar : अहो दादा, तर देशात इंजेक्शनचा तुटवडा पडेल ! असे कोण म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा राखुंडे- पाटील या तिरुपती येथे गेल्या आहेत त्यावेळी त्यांच्या धाराशिव येथील राहत्या घरी हल्लोखोरानी हल्ला केला. यावेळी त्यांच्या घरी बहिणीची मुलगी व जावई होते. यावेळी बहिणीची मुलगी व जावायला हल्लेखोरानी धक्काबुक्की केली आहे.

यावेळी हल्लेखोरानी घरासमोरील राखुंडे यांच्या गाडीची तोडफोडदेखील केली आहे. त्यासोबतच दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला असल्याचे मनीषा यांनी म्हटले आहे. त्याचबरोर मनीषा राखुंडे यांना ८ वाजून १२ मिनीटांनी दत्ता तुपे याने फोन करून तुला आज जिवंत ठेवणारा नाही, अशी धमकी दिली असल्याचे मनीषा यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, यापूर्वीही मनीषा राखुंडे या घरामध्ये असताना हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आताच्या घटनेत सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आरोपी कैद झाले आहेत.

त्यामुळे पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राखुंडे यांनी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आरोपीवर काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Maneesha Rakhunde Patil
Beed Crime News : मनोज जरांगेंचे सहकारी, कोपर्डीच्या आरोपींना न्यायालयाच्या आवारात चोप देणाऱ्या अमोल खुनेंवर हल्ला

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com