MP Amol Kolhe Vs Ajit Pawar : अहो दादा, तर देशात इंजेक्शनचा तुटवडा पडेल ! असे कोण म्हणाले...

MP Amol Kolhen's criticism of Ajit Pawar's statement : अजित पवारांच्या 'त्या' विधानावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात या वेळी चुरशीची लढत होणार आहे. नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत होणार असून, महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बारामती लोकसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अत्यंत गंभीरपणे घेतली असून, गेल्या काही दिवसांपासून अजितदादा मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मेळावे, जाहीर सभा, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असे कार्यक्रम अजित पवार घेत आहेत. 'आपल्या विरोधात बोलतील त्यांना इंजेक्शन द्या', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे डॉक्टरांच्या मेळाव्याला संबोधित करताना केलं होतं. यावर आता शिरूर (Shirur) लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Loksabha Election : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी 'काय पण', अजितदादा घेणार हर्षवर्धन पाटलांची भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावरती होते. आपल्या इंदापूरच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या मेळाव्याला संबोधित केलं. या वेळी डॉक्टरांकडे लोक आल्यानंतर खरंखरं बोलतात.आपलं काय दुखणं आहे हे डॉक्टरांच्या पुढे मांडतात. त्यामुळे तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर त्याच्याशी संवाद साधा आणि त्याची काय राजकीय भूमिका आहे ती जाणून घ्या. जर आपल्याला पूरक अशी राजकीय भूमिका असेल तर त्याचा चांगला इलाज करा आणि जर त्याची विरोधी भूमिका असेल तर त्याला चांगलंच इंजेक्शन द्या. असा गमतीशीर संवाद अजितदादांनी डॉक्टरांबरोबर साधला होता. त्यांच्या या विधानावर आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे हे विधान म्हणजे पीएचडी करून काय दिवे लावणार, अशा पद्धतीने विधान भवनात जी हेटाळणी केली होती, त्या पद्धतीचे आहे. हे विधान काही काळासाठी गृहीत धरलं तर देशात इंजेक्शनचा तुटवडा पडेल. कारण सर्वसामान्य माणसाने ठरवलंय 'अबकी बार भाजप हद्दपार..' आता भाजप हद्दपार म्हटल्यावर त्यांच्या मांडीवर जे कोणी बसलेत त्यांची काय परिस्थिती होईल हे सर्व्हेमध्ये समोर आलं आहे. त्याचबरोबर हे विधान ऐकल्यावर हेही पुन्हा अधोरेखित होतं की, लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असावा, असा टोलादेखील डॉ. कोल्हे यांनी लगावला.

Edited By : Chaitanya Machale

R

Ajit Pawar
Vasant More News : मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, 'राज'पुत्राची टीका !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com