Shivsena UBT News : काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांना गोळ्या घालून, त्यांचा धर्म विचारून ठार मारले. हिंदूंना गोळ्या घालण्याचे नीच कृत्य अतिरेक्यांनी केले. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी या अतिरेक्याचा खात्मा केला पाहिजे. तुमच्यात हिंमत असले तर सगळ्या अतिरेक्यांचा खात्मा करा, नाहीतर घरी बसा, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला.
चार अतिरेक्यांनी काल दुपारी काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवला. पुरुषांना वेगळे करत आणि त्यांचा धर्म विचारत गोळ्या घातल्या. या अतिरेकी हल्यात देशभरातून काश्मीरमध्ये आलेल्या 27 पर्यटकांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) संभाजीनगरमध्ये निदर्शने करत केला.
पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत क्रांतीचौकात काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना अतिरेक्याचा खात्मा करण्याचे आवाहन केले. अतिरेक्यांनी केलेले कृत्य हे नीच स्वरुपाचे आहे. धर्म विचारून फक्त हिंदूंना ठार मारले गेले. पत्नी, मुलं आणि कुटुंबियांच्या समोर अतिरेक्यांनी 27 पर्यटकांना गोळ्या घातल्या. हा भ्याड हल्ला असून मोदी, शहा यांनी हिंमत दाखवावी आणि सगळ्या अतिरेक्याचा खात्मा करावा.
हातावरची मेहंदी, हिरव्या बांगड्या घातलेल्या आणि सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या त्या महिलेच्या पतीला डोळ्या देखत गोळ्या घातल्या. मुस्लिम असेल तर सोडून दिले अन् फक्त हिंदूना ठार मारण्यात आले. संताप आणि चीड आणणारा हा अतिरेकी हल्ला आहे. याचा तातडीने बदला घेऊन अतिरेक्यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. अमरनाथ यात्रा आणि काश्मीरमध्ये वाढत्या पर्यटकांची संख्या रोखण्यासाठीच अतिरेक्यांनी हा हल्ला केला.
निश्चितच याचा परिणाम अमरनाथ यात्रा आणि पर्यटकांच्या संख्येवर होणार आहे. अतिरेक्यांचे हे मनसुबे उधळून लावायचे असतील तर मोदी-शहा यांनी हिंमत दाखवावी. सगळ्या अतिरेक्यांचा खात्मा करून या देशावरचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही, हे केवळ पाकिस्तानच नाही तर जगाला दाखवून द्यावे. ही हिंमत जर तुम्ही दाखवू शकत नसला, तर घरी बसा असा टोलाही खैरे यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.