Abdul Sattar News : सिल्लोड नगरपरिषदेसाठी एकटे अब्दुल सत्तारच मैदानात; विरोधकांचा अजून अभ्यासच सुरू!

Local Body Election 2026 : नगर परिषद निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र आजपासून स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. असे असतांना सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात मात्र राजकीय पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका.
Abdul Sattar Reday For Sillod Municipal Council News
Abdul Sattar Reday For Sillod Municipal Council NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

  2. या निर्णयामुळे सिल्लोडमध्ये राजकीय वातावरण तापले असून विरोधकांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

  3. सत्तार घराणे पुन्हा सत्तेसाठी सज्ज झाल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सचिन चोबे

Sillod Municipal Council : विधानसभा निवडणुकीत एका लाखाच्या मताधिक्याचा दावा करणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे काठावर पास झाले. अवघ्या 2420 मतांनी निवडून आल्यानंतर सत्तार यांनी ही धोक्याची घंटा ओळखत वेळीच सावध पावित्रा घेतला. महायुती सरकारमध्ये मंत्री पद न मिळाल्याने नाराज झालेल्या सत्तार यांनी स्वतःला मतदारसंघात गुंतवूण घेतले. गेली दीड वर्ष ते मतदारसंघ सोडून फारसे बाहेर गेलेच नाही. आता सिल्लोड नगरपरिषदेवरील वर्चस्व कायम राखत मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत.

अब्दुल सत्तार यांची नगरपरिषदेसाठी जोरदार तयारी झाली असली तरी अद्याप विरोधकांचा अभ्यासच सुरू असल्याचे चित्र सिल्लोडमध्ये आहे. सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. तर विरोधकांचे मात्र अद्याप एकमत होताना दिसत नाहीये. सध्या शिवसेनेचा पेहलवान मैदानात अंगाला लाल माती लावून उतरला असला तरी विरोधी बाजूचा पेहलवानाची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही.

नगर परिषद निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र आजपासून स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. असे असतांना सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात मात्र राजकीय पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका बघावयास मिळत आहे. दुसरीकडे नेहमी प्रमाणे निवडणुकीच्या तयारीत अब्दुल सत्तार यांनी पुस्तकाचे पान उलटावे त्या प्रमाणे शिवसेनेकडून मुलगा अब्दुल समीर यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून प्रचार कार्यालयही थाटले.

Abdul Sattar Reday For Sillod Municipal Council News
Abdul Sattar News : मुंबईत उपोषण, सिल्लोड न्यायालयाकडून चौकशीचे आदेश ; अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात!

दुसरीकडे प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपात मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होतान दिसत नाही. इतर पक्षात नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांसाठी अद्याप चाचपणी सुरू आहे. याऊलट आमदार सत्तार यांनी प्रभागातील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती नावाला जरी असल्या तरी त्यांनी अनेक प्रभागातील उमेदवार निश्चित करून या निवडणुकीची रणनीती आखत प्रत्यक्ष राजकीय डावपेच टाकायला सुरूवात केली आहे.

Abdul Sattar Reday For Sillod Municipal Council News
Abdul Sattar : मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी अब्दुल सत्तार स्वबळावर मैदानात; विरोधक रोखणार का?

विरोधक कुठे आहेत?

नगर परिषदेच्या चौदा प्रभागातून निवडून द्यायच्या 28 नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सत्तार यांच्या विरोधात भाजपसह इतर पक्षांना अद्यापही मोट बांधता आलेली नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक लढत आहेत. असे असले तरी सिल्लोड विधानसभा मतदार संघात अब्दुल सत्तार विरुद्ध भाजप असाच राजकीय लढा अनेक वर्षांपासून बघावयास मिळत आहे.

राज्याच्या सत्तेत जरी हे पक्ष मांडीला मांडी लावून बसले असले तरी, या मतदारसंघात परिस्थिती वेगळी आहे. मागील निवडणुकांचा विचार केल्यास सत्तार यांच्या पक्षाचे कालचे नाव वेगळे, आजचे नाव वेगळे असे आहे. याही पुढे जाऊन विचार केल्यास उद्याचे नाव काय? हे फक्त सत्तारच सांगू शकतात. त्यामुळे सिल्लोडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्ष न बघता आमदार सत्तार यांच्या विरोधातच लढल्या जात आहेत.

FAQs

1. सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तारांचा काय निर्णय झाला?
→ अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे.

2. या निर्णयावर विरोधकांची काय प्रतिक्रिया आहे?
→ विरोधक सत्तार घराण्याच्या राजकारणावर टीका करत असून स्वतःच्या उमेदवाराची घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे.

3. सिल्लोडमधील सत्तार घराण्याचा प्रभाव कसा आहे?
→ सिल्लोड परिसरात सत्तार कुटुंबाचा मजबूत राजकीय पाया असून त्यांचा मोठा मतदार वर्ग आहे.

4. नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा किती तीव्र होऊ शकते?
→ स्थानिक पातळीवर अनेक नेते तयारीत असल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे.

5. निवडणुकीचा परिणाम सत्तार यांच्या भविष्यावर कसा परिणाम करू शकतो?
→ या निवडणुकीत विजय मिळाल्यास सत्तार घराण्याची पकड अधिक मजबूत होईल; परंतु पराभव झाल्यास त्यांची प्रतिमा डळमळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com