Solanke Chaudhari news : एकमेकांचे कपडे फाडणाऱ्या सोळंके, चाऊस यांनी एकमेकांना पेढे भरवले; कोणत्या समिकरणाची नांदी?

Maharashtra politics rivals become friendly : एकमेकांचे कपडे फाडणारे सोळंके आणि चाऊस एकमेकांना पेढे भरवताना दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समिकरणाची नांदी का?
Former political rivals Solanke and Chaudhari exchange sweets, sparking speculation about a possible shift in political equations.
Former political rivals Solanke and Chaudhari exchange sweets, sparking speculation about a possible shift in political equations.Sarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग उगले

Solanke Chaudhari controversy : राजकारणात कोणीच कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो या म्हणीचा प्रत्यय गुरुवारी उपनराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाकडून निवडून आलेल्या सहाल चाऊस यांनी उपनगराध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षाचे नेेते मोहनराव जगतापांवर कुरघोडी करत चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेतली. निवडणुकीच्या प्रचारात टोकाचे आरोप - प्रत्यारोप करत एकमेकांचे कपडे फाडणारे आमदार प्रकाश सोळंके व सहाल चाऊस सत्तेसाठी एकत्र आले आणि एमेकांना पेढेही भरविले.

माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी मोहन जगताप, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांच्या सहकार्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. यात नगराध्यक्षपदासाठी सहाल चाऊस यांच्या स्नुषा मेहरीन शिफा चाऊस विजयी झाल्या. नगराध्यक्षपद घरात आल्यानंतरही सहाल चाऊस यांना उपनगराध्यक्षपदही स्वतःलाच पाहिजे होते. परंतु, यासाठी त्यांच्या नेत्यांसह नगरसेवकातून विरोध होऊ लागला. यामुळे सहाल चाऊस यांनी कुरघोडीचे राजकारण करत ‘दुश्मन का दुश्मन, आपण दोस्त’ या उक्तीने रणनिती आखली.

Former political rivals Solanke and Chaudhari exchange sweets, sparking speculation about a possible shift in political equations.
Chhatrapati Sambhjinagar : मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वीच मोठा राडा; पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा नेमकं काय घडलं?

त्याला विरोधक प्रकाश सोळंके यांनीही खतपाणी घातले. नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण करण्याची मिळालेल्या आयत्या संधीचे सोने करत आमदार सोळंके यांनी सहाल चाऊस यांची थेट पक्षप्रमुख अजित पवारांची भेट घालून बैठक घडवून आणली आणि उपनगराध्यक्ष पदासाठी १० नगरसेवकांचा बिनशर्त पाठींबा जाहीर केला. याच बळावर गुरुवारी झालेल्या निवडीत सहाल चाऊस यांची बिनविरोध निवडही झाली. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर चिखलफेक करणारे सत्तेसाठी कसे एकत्र येतात याचे मुर्तीमंद उदाहरण संपूर्ण मतदारांनी ‘याची देही, याची डोळा’ पुन्हा एकदा पहिले.

दरम्यान, नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. १० नगरसेवकांच्या बळावर विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु नगराध्यक्षांच्या सासऱ्यांनाच उपनगराध्यक्षपदासाठी पाठींबा देऊन आमदार सोळंके यांनी पालिकेच्या सत्तेत वर्चस्व निर्माण केले.

Former political rivals Solanke and Chaudhari exchange sweets, sparking speculation about a possible shift in political equations.
Pune Election Result 2026: सुरुवातीच्या कलांमध्ये पुण्यात भाजप आघाडीवर; राष्ट्रवादीला किती जागा? काँग्रेसने खातं उघडलं नाही

दरम्यान, निवडणुकीत एकमेकांना टोकाचा विरोध करणारे सोळंके व चाऊस यांची उपनगराध्यक्ष निवडीच्या समिकरणातील गठ्ठी आणि निवडीवेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद नव्या समिकरणाची नांदी असल्याचे बोलले जाते. आगामी काळात चाऊस यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाचीही शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगीतले. त्यामुळेच सोळंके समर्थक नगरसेवकांनी पाठींबा दिल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com