Ambadas Danve News : सगळेच खेळ मोबाईलवर खेळले जात नाहीत ; बॅडमिंटन हाॅलला गळती लागल्यानंतर अंबादास दानवेंचा नव्या क्रीडा मंत्र्यांना टोला..

Sports Minister Ambadas Danve targets mobile gaming, stating that not all games can be played on phones. Some require open grounds and indoor halls : गेल्या काही वर्षात या क्रीडा संकुलाची वाट लागली आहे. मैदान, हाॅल, ट्र्ॅक अशा सगळ्याच ठिकाणी सुविधांच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे.
Ambadas Danve On Badmintan Court News
Ambadas Danve On Badmintan Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : काही महिन्यापुर्वी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलातील कोट्यावधी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. हे प्रकरण राज्यभरात गाजल्यानंतरही या संकुलातील असुविधा, खेळांडूना होणारा त्रास याची मालिका काही केल्या संपत नाहीये. विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलच्या छताला गळती लागल्याने ट्रॅकवर बकेट आणि कपडा ठेवून खेळावे लागत आहे.

यावर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नव्या क्रीडा मंत्र्यांवर निशाणा साधला. बॅडमिंटन ट्रॅक आणि हाॅलची दुर्दशा दाखवणारे फोटो पोस्ट करत दानवे यांनी वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला आहे. दानवे यांनी 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नव्या विभागाचा कारभार समजून घेतला असेल तर थोडे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलकडे बघावे.

छतातून होणाऱ्या गळतीमुळे बकेट आणि कपडा अंथरून बॅडमिंटन स्पर्धेचे सामने खेळवावे लागत आहेत. काय आहे, सगळेच खेळ मोबाईलवर खेळले जात नाहीत. काही मैदानावर आणि बंदिस्त हॉलमध्येही खेळले जातात. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आपणही संकुल समितीचे प्रमुख आहात, जरा बघा इकडे अशा शब्दात अंबादास दानवे यांनी त्यांनाही सुनावले आहे. मराठवाड्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धाची तयारी करता यावी यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आले होते.

Ambadas Danve On Badmintan Court News
Ambadas Danve-Atul Save News : इम्तियाज जलील यांच्या बिर्याणीचा ठसका अतुल सावे- अंबादास दानवेंना!

परंतु गेल्या काही वर्षात या क्रीडा संकुलाची वाट लागली आहे. मैदान, हाॅल, ट्र्ॅक अशा सगळ्याच ठिकाणी सुविधांच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. उलट इथे होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यामुळे हे विभागीय क्रीडा संकुल बदनामा झाले आहे. राज्याचे वादग्रस्त माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे. विधीमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना कृषीमंत्री पदावरून हटवण्यात आले.

Ambadas Danve On Badmintan Court News
Sanjay Shirsat News : संजय शिरसाट यांची साडेसाती संपेना! दीड हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याची तक्रार थेट सतर्कता आयोगाकडे..

आता क्रीडा विभागाचा कारभार त्यांना सोपवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी त्यांना छत गळत असलेल्या बॅटमिंटन हाॅलचे फोटो पाठवून प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, मुंबईत सुरू असलेला पाऊस आणि साचलेले पाणी, यावरूनही त्यांनी सत्ताधारी महायुतीला खडेबोल सुनावले आहेत. पाऊस एवढा पडतोय की मुंबईच्या नाका तोंडात पाणी जाण्याची वेळ आली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील नेते अजून झोपलेले आहेत बहुदा. कारण अजून उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची टेप कुठेच वाजलेले दिसत नाही! आश्चर्य आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com