Bhokar Assembly Constituency : श्रीजया तुमची मुलगी , ती विधानसभेत तुमचे प्रश्न मांडेल..

Srijaya Chavan is your daughter, she will ask your questions in the hall : भारतीय जनता पक्षाने श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, ती तुमची मुलगी असुन ती तुमचे प्रश्न सभागृहात मांडणार आहे.
Ashok Chavan Bhokar News
Ashok Chavan Bhokar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : बंजारा समाजासाठी पोहरा देवी येथे बंजारा भवन बांधण्यात आले असून भोकर येथे बांधकाम सुरू आहे. बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याची, ग्वाही माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी धावरी तांडा (ता भोकर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिली.

भोकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभा, बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला. (Ashok Chavan) भोकर तालुक्यातील घावरी तांडा येथे सभा घेण्यात आली यावेळी अ‍ॅड. रामराव नाईक, रोहिदास जाधव, मोहन राठोड, भगवानराव दंडवे, प्रकाश भोसीकर, उत्तमराव चव्हाण, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीच्या उमेदवारांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. (Nanded) भारतीय जनता पक्षाने श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, ती तुमची मुलगी असुन ती तुमचे प्रश्न सभागृहात मांडणार आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात येणार आहे.

Ashok Chavan Bhokar News
Bhokar Assembly Constituency : आजोबा, वडील अन् आईने मतदारसंघाचा विकास केला, आता ती जबाबदारी माझ्यावर!

महायुतीच्या सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ जनतेला मिळत आहे. या योजना सुरू ठेवणे आवश्यक असुन त्यासाठी महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. नांदेड लोकसभा व भोकर विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

Ashok Chavan Bhokar News
Ashok Chavan: लाॅटरी एकदाच लागते, पुन्हा पुन्हा नाही! अशोक चव्हाण यांचा महाविकास आघाडीला टोला

मोहन राठोड म्हणाले की, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अशोक चव्हाण यांनी खूप निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणी पुरवठा, पांदन रस्ते, अंतर्गत रस्त्यांची कामे झाली असून राहिलेले कामं करण्यात येणार आहेत. श्रीजया चव्हाण यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

तर रामराव नाईक यांनी विकास कामे करण्याची क्षमता अशोक चव्हाण यांच्यातच आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंद आहे. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे. डाॅ. संतुकराव हंबर्डे व श्रीजया चव्हाण यांना विजयी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com