Start the first phase of Gharkul Yojana immediately : प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या सात हजार घरांचा पहिल्ला टप्पा सुरू करा..

Aimim News : हक्काची घरे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शहरातील प्रत्येक वार्डात निदर्शने उपहासात्मक घरांचे वाटप करणार.
Start the first phase of Gharkul Yojana immediately News
Start the first phase of Gharkul Yojana immediately NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mp Imtiaz Jalil : गोरगरीबांसाठी असलेली पंतप्रधान आवास योजना अद्यापही कागदावरच असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी उपहासात्मकरित्या पंतप्रधान घरकूलचे वाटप केले होते. (Start the first phase of Gharkul Yojana immediately) त्यानंतर खडबडून जाग आलेल्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी आज तातडीने योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.

Start the first phase of Gharkul Yojana immediately News
Bhumre said about ministership : ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं ते नावारुपाला आणलं, मग कसली नाराजी ?

बैठकीत सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, (Imtiaz jalil) आमदार प्रदिप जैस्वाल यांनी घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे सात हजार घराचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. (Aimim) मनपा प्रशासन जमीन व टेंडरच्या गुंतागुंतीतच अडकल्याने गृहप्रकल्पाचे काम सुरु होणार आहे किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाल्याने आज सर्व लोकप्रतिनिधींनी मनपा प्रशासनाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

आता तात्काळ निर्विवादीत जागेवर गृहप्रकल्पाचे काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Aurangabad) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील नागरीकांना स्वत:ची पक्की घरं मिळणार होती. परंतु सात वर्षापासून योजनेचे काम रखडल्याने व ३१ मार्च २०२२ रोजी योजनेची मुदत संपणार असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी पुढाकार घेवून योजनेचा कार्यकाळ दोन वर्षाकरिता वाढवून देण्याबाबत विंनती केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील हे केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हल्पमेंट कमिटीत सदस्य असल्याने त्यांनी थेट कमिटीत रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना गृह प्रकल्पाची तक्रार केली होती. तक्रारीची गंभीररित्या दखल घेत कमिटीने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करत महाराष्ट्रातील १३ वरिष्ठ अधिकार्‍यांना सर्व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले होते.

ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे सचिव दर्जाचे अधिकारी यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांचाही समावेश होता. केंद्रीय अर्बन डेव्हल्पमेंट कमीटीने संबंधित मंत्रालय व कार्यान्वित यंत्रणेला आदेश दिल्याने शहरात घरकुल गृह प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात आली व टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु त्यानंतरही गृह प्रकल्पाचे काम रखडल्याने इम्तियाज यांच्या मार्गदर्शनाखाली आज एमआयएम युथ विंगच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे मुखवटे लावून स्मार्ट सिटी समोर निदर्शने करण्यात आली.

Start the first phase of Gharkul Yojana immediately News
Beed March News : पवार-राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या विरोधात पहिला मोर्चा बीडमध्ये..

शहरातील पन्नास हजार गोरगरीबांना पक्की सर्वसोयीसुविधांनी युक्त घरे मिळणार होती. योजना आजपर्यंत प्रलंबितच आहे. संपुर्ण योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आज मनपा प्रशासनाच्या वतीने तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले. पंरतु बैठकील तीनच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संदिपान भुमरे, भागवत कराड, आमदार संजय शिरसाट यांच्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी गैरहजर असल्याने इम्तियाज यांनी नाराजी व्यक्त केली. गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शहरातील प्रत्येक वार्डात निदर्शने उपहासात्मक घरांचे वाटप करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.