Success Story : पोलीस उपनिरीक्षक ते 'डीएसपी' ; बदापूरच्या शिवकुमार पारवे यांची जिद्दीच्या जोरावर यशाकडे वाटचाल

Sub Inspector Of Police To Deputy Superintendent : पोलीस उपनिरीक्षक ते 'डीएसपी' शिवकुमार यांचा थक्क करणारा प्रवास
Shivkumar Parave
Shivkumar ParaveSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivkumar parave Deputy Superintendent : जालना जिल्हातील अंबड तालुक्यातील बदापूर येथील छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरूणाने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशसंपादन केले आहे. शिवप्रसाद नानासाहेब पारवे यांनी अधिकारी व्हायचेच या जिद्दीसह स्पर्धा परीक्षा दिल्या, आधी पोलीस उपनिरीक्षक, मग जिल्हा उपनिबंधक, त्यानंतर नायब तहसीलदार आणि आता थेट पोलीस उपअधीक्षकपद मिळवले आहे. चिकाटी, अभ्यास,अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

शिवप्रसाद नानासाहेब पारवे यांचे वडील नानासाहेब हे अल्पशिक्षित. त्यांचा गावात शेतीसोबतच एक छोटासा व्यवसाय आहे. आई, वडील आणि भाऊ नवनाथ असा शिवप्रसाद यांचा परिवार आहे. पारवे यांच्या वडिलांना मुलांनी शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती. त्यामुळे नानासाहेब पारवे यांनी छत्रपती संभाजीनगरात शिवप्रसाद आणि नवनाथ या भावंडांना त्यांनी शिक्षणासाठी ठेवले.

Shivkumar Parave
Sanjay Raut On Upcoming Election: जे कर्नाटकमध्ये घडलं, तेचं महाराष्ट्रात घडणार..

नवनाथ यांनी शिक्षण पूर्ण करत पोलीस भरतीची तयारी केली. ते शहरात पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीलाही लागले. शिक्षण सुरू असताना आपणही भावासारखे पोलीस दलात जावे, असे शिवकुमार यांचे स्वप्न होते. छत्रपती संभाजीनगर येथून त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर. देवगिरी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस खात्यात जाण्याच्या स्वप्नाकरिता त्यांनी मेहनत आणि जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीला ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले.

2016 ते 2019 पर्यंत पोलीस उपनिरिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. त्यात त्यांनी यश मिळवले आहे. जिल्हा उपनिरिक्षक झाले. २०१९ पासून सलग दीड वर्षे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य बजावले होते.त्यानंतर त्यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षा दिली. 2020 मध्ये नायब तहसीलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली.वर्ष 2020 ते 2019 बुलडाणा येथे नायब तहसीलदार पदावर पदभार सांभाळला आहे.

Shivkumar Parave
BJP Assembly Chief : भाजपची लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी; 288 मतदारसंघातील निवडणूक प्रमुख जाहीर

एवढ्यावरच समाधान न मानता, प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा २०२२ ला लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा दिली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२३ ला मुलाखत झाली. त्यात पोलीस अधीक्षकपदासाठी ते यशस्वी ठरले आहेत. पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक अशी मजल मारली आहे.

"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यश अपयश हे आपल्या मेहनत व चिकाटीवर अवलंबून असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवावी. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. अथक परिश्रम व जिद्दीच्या बळावर काहीही होऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शकाची खरी गरज आहे.प्रचंड मेहनत घेतल्यास यश आपल्यापासून फार दूर नाही." असे शिवकुमार पारवे यांचे मत आहे.