Prakash Ambedkar: "साखरेचा दर लवकरच शंभर रुपयांवर जाणार", प्रकाश आंबेडकरांचा दावा; कारणही सांगितलं

Prakash Ambedkar: भारताने फक्त याच वर्षी कच्ची साखर आयात केली. याआधी भारत साखर निर्यात करायचा, जास्तीत जास्त साखर आपल्याकडे होती.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar: आपल्याकडे मुबलक साखरेचा साठा होता, उलट अतिरक्त साखर आपण निर्यात करायचो. पण केंद्रातील सरकारने फक्त पैसा कमावचा हा अजेंडा डोळ्यासमोर ठेवल्यामुळे आज ८० रुपये किलो असलेली साखर येत्या दहा-बारा दिवसांत शंभर रुपये किलो होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भारताने फक्त याच वर्षी कच्ची साखर आयात केली. याआधी भारत साखर निर्यात करायचा, जास्तीत जास्त साखर आपल्याकडे होती. परंतू या सरकारचे कुठल्याच पद्धतीचे नियोजन केले नाही. फक्त कमावणे एवढाच अजेंडा असल्यामुळे कच्ची साखर आणि मळी ही इथेनॉलकडे वळविण्यात आली. यामुळे यावर्षी भारताला दुप्पट किमतीत १० लाख टन साखर आयात करावी लागत आहे.

Prakash Ambedkar
Explainer: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी ऊसाचा वापर वाढला! तुटवड्यामुळं सध्या साखरेचे दर वाढलेत का? नेमकं कारण काय?

आज साखरेचा भाव ८० रुपये किलो आहे, येत्या १०-१२ दिवसात साखरेचा भाव १०० रुपये किलो पर्यंत जाईल. जनतेला आमचे सांगणे आहे की, साखरेचे भाव वाढलेले आहेत ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सत्तेत बसलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदचे सदस्य, नगरसेवक, आमदार-खासदार यांच्या घरासमोर धरणे धरावे लागेल. साखरेचा भाव पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतले पाहिजे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

साखर उत्पादन कमी झाल्यामुळे इथेनॉलसाठी ऊसाचा वापर झाल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी केंद्र सरकारने सध्याची दरवाढ मुख्यतः इथेनॉलकडे वळवलेल्या ऊसामुळे झालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. यंदा इथेनॉलसाठी वळवलेली साखर मागील वर्षांपेक्षा कमी असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे.

Prakash Ambedkar
Video: मराठी सक्तीचा धाक! परप्रांतीय रिक्षावाला परतीच्या वाटेवर, थेट रेल्वेच्या डब्यातूनच नेली रिक्षा; व्हिडिओ व्हायरल

अलिकडच्या आठवड्यांत देशातील साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २० जुलैला साखरेचा सरासरी भाव सुमारे ४८.१८ प्रति किलो होता, तो २० ऑगस्टला ५५.७० किलोपर्यंत पोहोचला. काही शहरांमध्ये किरकोळ दर ६०-६५ किलोच्या आसपास गेले आहेत. दर झपाट्याने वाढत असून ते ८० रूपयांवर पोहचण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com