Video: मराठी सक्तीचा धाक! परप्रांतीय रिक्षावाला परतीच्या वाटेवर, थेट रेल्वेच्या डब्यातूनच नेली रिक्षा; व्हिडिओ व्हायरल

Compulsory Marathi : सोशल मीडियात सध्या मराठी हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्र्याांनी राज्यातील रिक्षाचालकांना मराठीत संवाद साधनं बंधकारक केलं आहे.
Video Viral_Rikshwa
Video Viral_Rikshwa
Published on: 
Updated on: 

Compulsory Marathi Mumbai News : सोशल मीडियात सध्या मराठी हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्र्याांनी राज्यातील रिक्षाचालकांना मराठीत संवाद साधनं बंधकारक केलं आहे. विशेषतः मुंबईत जे परप्रांतीय रिक्षाचालक आहेत, त्यांच्यासाठी सरकारनं मराठीचे धडे द्यायलाही सुरुवात केली आहे. जिथं आपण पोटापाण्यासाठी काम करतो तिथली स्थानिक भाषा यायला हवी, तसंच मराठी अर्थात आपल्या मातृभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पण याला काही परप्रांतियांनी विरोध दर्शवला आहे. त्यातून एकानं परत आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा निर्णय घेताना सोबत ट्रेनमधून रिक्षा घेऊन जात असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळं मराठी सक्तीचा यांनी चांगलाच धसका घेतल्याचं चित्र आहे.

व्हिडिओत काय?

सोशल मीडियात जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा व्हिडिओ आहे. प्लॅटफॉर्मवर रेल्वेगाडी थांबलेली असून या गाडीच्या लगेजच्या अर्थात पार्सलच्या डब्यात जिथून दुचाकी वाहनं, तीनचाकी वाहनांनी इतर राज्यांमध्ये सुरक्षितरित्या वाहतूक केली जाते. या डब्यात एक रिक्षाचालक इतर काही लोकांच्या मदतीनं आपली रिक्षा कोंबताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ मराठीच्या सक्तीमुळं परत निघालेल्या रिक्षाचालकाचा आहे की नाही? याबाबत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. पण मराठी हॅशटॅगसह हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे.

Video Viral_Rikshwa
Isro News: सरकारची आणखी एका बड्या खासगीकरणाची घोषणा! आता इस्रो बनवणार नाही अंतराळयानं; 'या' खासगी कंपन्यावर सोपवली जबाबदारी

कुर्ला रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ

हा व्हिडिओ मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील असून ज्या रेल्वेच्या डब्यात रिक्षा चढवली जात आहे, ती रेल्वे 01074 (बनारस-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस) आहे. तर रिक्षाचा क्रमांक MH 03 CT 5775. अर्थात ही रिक्षा मुंबई पूर्व (वडाळा आरटीओ) पासिंगची रिक्षा आहे. त्यामुळं रिक्षा मुंबईतून बनारस अर्थात उत्तर प्रदेशकडं जात असल्याचं या माहितीवरुन स्पष्ट होत आहे.

Video Viral_Rikshwa
Revenue Department: महसूल विभागाचा तहसीलदारांवर सर्जिकल स्ट्राईक! मोठा अधिकार घेतला काढून, आता मनमानी कारभार बंद

मराठी भाषेतच बोलण्याचं आवाहन

त्यामुळं सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मराठी शिका नाहीतर रिक्षाचा परवाना रद्द या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत. तसंच या परप्रांतिय लोकांसाठी राज्य सरकारनं मराठी शिकायला मोफत क्लास आणि वेळही दिला आहे. तरीपण ही लोकं निघून जाऊ पण मराठी शिकणार नाही यावर अडून राहिले आहेत. पण आपण मराठी माणसं उगाचच त्यांच्या कम्फर्टसाठी त्यांच्याशी हिंदीत बोलतो. आपल्याला पण आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com