Sugarcane FRP : एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणाऱ्या कारखान्यांना दणका; आता थेट हायकोर्टातच याचिका

Sugarcane FRP Maharashtra : महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ च्या कलम तीननुसार राज्य सरकारने 'ऊस नियंत्रण मंडळ' स्थापन करणे बंधनकारक आहे. या मंडळाने रंगराजन समितीच्या सूत्रानुसार ऊसाचा अंतिम दर ठरवायचा असतो. मात्र, मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे साखर कारखाने हक्काचा भंग करत स्वतःच दर जाहीर करत आहेत.
Sugarcane FRP 2026-27 | Sugar Mills PIL | Hearing
Sugarcane FRP 2026-27 | Sugar Mills PIL | HearingSarkarnama
Published on: 
Updated on: 

High Court : केंद्र सरकारने २०२६-२७ या गाळप हंगामासाठी उसाचा एफआरपी ३६५० रुपये प्रतिटन जाहीर केल्यानंतर देखील साखर कारखाने कमी दर देत असल्याकडे लक्ष वेधत साखर कारखान्यांच्या मनमानीविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तीन डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत साखर कारखान्यांच्या मनमानीवर आक्षेप घेतला असून राज्य सरकारने कायद्याने बंधनकारक असलेल्या 'ऊस नियंत्रण मंडळा'ची स्थापना का केली नाही, या प्रश्नावरही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. साखर कारखान्यांना स्वतःच्या मर्जीने ऊसाचा दर जाहीर करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ च्या कलम तीननुसार राज्य सरकारने 'ऊस नियंत्रण मंडळ' स्थापन करणे बंधनकारक आहे.

या मंडळाने रंगराजन समितीच्या सूत्रानुसार ऊसाचा अंतिम दर ठरवायचा असतो. मात्र, मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे साखर कारखाने हक्काचा भंग करत स्वतःच दर जाहीर करत आहेत. ही थेट कायद्याची पायमल्ली आहे, असे याचिकेत नमूद करण्यता आले आहे. केंद्र सरकारने गाळप हंगामासाठी ऊसाचा एफआरपी ३६५० रुपये प्रतिटन जाहीर केला आहे.

Sugarcane FRP 2026-27 | Sugar Mills PIL | Hearing
निवडणुकीआधीच भाजपला धक्का, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळील दोन नेत्यांनी सोडला पक्ष, जाहीर केली भूमिका

मात्र, अहिल्यानगरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (३२०० रुपये), अशोक सहकारी साखर कारखाना (३१५० रु.) आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना (३२०० रु.) या व इतर साखर कारखान्यांनी कमी दर जाहीर करून कायद्याचे उघड उल्लंघन केले आहे, असे म्हटले आहे.

Sugarcane FRP 2026-27 | Sugar Mills PIL | Hearing
MGNREGA Payments : चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे अडकले! काँग्रेस खासदाराचा पंचायत समितीसमोर ठिय्या

कारखान्यांना दिलासा देण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पहिला हप्ता म्हणून ४,५०० रुपये प्रतिटन आणि एकूण ७०/३० प्रमाणे अंतिम भाव प्रतिटन दर मिळणे पूर्णपणे न्याय्य असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर तीन डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.