Ranjit Kasle News : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेवर सहावा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Ranjit Kalse Crime : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
Ranjit Kasale
Ranjit KasaleSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावरुन लोकप्रतिनिधींबद्दल अश्‍लील टिपण्णी आणि सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची फिर्याद मोहन आघाव यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची आणि शिवसेना पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेवर (Ranjit Kasle) शुक्रवारी गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वीही कासलेवर अॅट्रोसिटीसह फसवणुकीचे दोन आणि निवडणूक आयोगाच्या बदनामीचा एक असे एकूण पाच गुन्हे नोंद आहेत. पोलीस व न्यायालयीन कोठडीची हवा खाऊन तो नुकताच बाहेर आला आहे.

रणजित कासले याने फेसबुकवर लोकप्रतिनिधींबद्दल अश्‍लील टिपण्णी तसेच दोन गटांना समोरा समोर येऊन भिडा, मला साथ द्या, असं आवाहन केल्याने जातीय दंगली, हिंसा व अस्थिर सामाजिक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे शिक्षक मोहन आघावर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन हा गुन्हा पोलिसांत (Police) नोंद करण्यात आला.

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकामागून एक धक्कादायक दावे तो करत आहेत. सुरूवातीला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी आपणाला ऑफर होती, असा खबळजनक दावा केल्यानंतर तो चर्चेत आला.

Ranjit Kasale
Sadashiv Peth Accident CCTV: अंगाचा थरकाप उडवणारं सदाशिव पेठेतील अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, नेमकं काय घडलं?

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

पुण्यात आल्यानंतर कासले मीडियाशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवल्याचा गौप्यस्फोट केला होता. मतदानाच्या दिवशी ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले याने केला होता.

Ranjit Kasale
NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कधी होणार निर्णय, रोहित पवारांनी सांगितला मुहूर्त

बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो व्हिडिओ बनवून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होता. आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर असल्याचे तसेच यासाठी 5 ते 50 कोटीही देण्यात येणार होते, असा दावा त्याने केला होता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com