Parbhani Politics : ठाकरे गटाच्या जाधवांनी जाहीरपणे भाजपच्या बोर्डीकरांचे ऋण व्यक्त केले!

Sanjay Jadhav and Meghna Bordikar : एकीकडे राज्यात ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ही घटना समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण
Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Sanjay Jadhav and Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची सरशी झाली. शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. भाजपचा डाव यशस्वी ठरल्यामुळे कालपासून राज्यात भाजप विरुद्ध ठाकरे गटात संघर्ष सुरू असताना, ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परभणीत मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी भाजपच्या आमदार मेघाना बोर्डीकर आणि त्यांच्या परिवाराबद्दल ऋण व्यक्त केले.

त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बोर्डीकर आणि जाधव यांचे राजकीय संबंध आणि मैत्री असल्याचे माहीत असलेल्यांसाठी ही गोष्ट नवी नाही. तरीही राज्यातील राजकीय परिस्थिती आणि संघर्ष पाहता ठाकरे गटाच्या खासदाराने भाजपच्या(bjp) आमदार व त्यांच्या कुटुंबाबद्दल ऋण व्यक्त करण्याचे धाडस दाखवले हेही नसे थोडके, अशी चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Shivsena News : बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक; शिवसैनिकांनी मुंडन करुन केला निकालाचा निषेध

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक विकासकामांबाबत प्रशासन आणि राजकीय नेते अलर्ट मोडवर आहेत. सर्व मान्यतेचे सोपस्कार तातडीने पार पाडून उद्घाटन कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाला राजकीय रंग मिळत आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमाची चर्चा खासदार संजय जाधव(Sanjay Jadhav), राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे जास्त होत आहे. याशिवाय भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर व त्यांच्या परिवाराबद्दल ऋण व्यक्त करत जाधव त्यांनी या कार्यक्रमाला वेगळेच वळण दिले. दुसरीकडे मेघना बोर्डीकर यांनी विकासकामात राजकारण केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Raosaheb Danve News : राहुल गांधींनी अजून यात्रा काढाव्यात, रावसाहेब दानवेंनी सांगितले कारण...

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीना निमंत्रित करण्यात आले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आठ ते दहा गाड्यामधून कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी नेत सिनेस्टाईल शक्तीप्रदर्शन केले. तसेच जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे विजय भांबळे यांनींही कार्यकर्त्यासह कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. मात्र भांबळे यांच्या कार्यकर्त्याकडून पोस्टरबाजी करण्यात आली. यामुळे जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर(Meghna Bordikar) यांनी नाराजी व्यक्त केली.

Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Dharashiv Loksabha : धाराशिव लोकसभेसाठीही भाजपचे धक्कातंत्र, इच्छुकांची बोबडी वळणार!

विजय भांबळे यांच्यावर निशाणा -

संजय जाधव यांनी बोर्डीकर यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मानित केले व अखेर कार्यक्रमाला सुरूवात झाली भाषणादरम्यान जाधव यांनी बोर्डीकर परिवाराचा ऋणी असल्याचे सांगितले. मात्र जिंतूर मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमादरम्यान डावलल्याचा मुद्दा उपस्थित करत नाराजीही व्यक्त केली. विकासाच्या मुद्द्यावर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करत त्यांनी या वादावर पडदा टाकला.

मात्र तरीही भांबळे यांनी खासदार जाधव यांचे भाषण संपताच व मेघना बोर्डीकर यांचे सुरु होत असताना मंडपातून काढता पाय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भांबळे यांना विकास करता आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. जाधव यांनी आपल्या भाषणादरम्यान बोर्डीकर परिवाराचे ऋण व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव हे शिवसेनेचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय भांबळे हे त्यांचे विरोधक होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व विजय भांबळे यांच्यात अनेक वर्षापासून राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे बोर्डीकर परिवाराची साथ जाधव यांना मिळत असल्याचे बोलले जाते. त्या निवडणुकीत संजय जाधव यांचा विजय झाला. त्या दृष्टीकोनातून संजय जाधव यांनी बोर्डीकर परिवाराचे ऋणी असल्याचे वक्तव्य केल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com