Chhatrapati Sambhaji Nagar : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इंडिया आघाडी विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विरोधात ही लढाई होणार आहे. काँग्रेसने भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडी उभी केली आहे. याशिवाय देशात भाजपच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा भारत जोडो यात्रा काढण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राहुल गांधी यांनी अजून यात्रा काढाव्यात, असे म्हणत खिल्ली उडवली.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशात सगळीकडे भारत जोडो यात्रा काढावी, त्यांच्या यात्रेचा परिणाम आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे. नुकत्याच झालेल्या छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत लागलेला निकाल हा त्याचाच परिणाम आहे, असा टोला रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी लगावला. राहुल गांधी यांनी यात्रा काढावी, मग आम्ही अब की बार चारसौ पार जागा जिंकूनच दाखवतोच, असा दावाही दानवे यांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात काल लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालावर भाष्य करताना रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. काँग्रेसच्या तुलनेत भाजपची निवडणूक तयारी कमी दिसते. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढून भाजपाला आव्हान देणार आहे. या संदर्भात विचारले असता रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुका आल्या की काँग्रेसला यात्रा, देव आणि मंदिर आठवतात. निवडणुका संपल्या की राहुल गांधी, सोनिया गांधी देवधर्म विसरतात. याआधी कधी कुणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मंदिरात गेलेले पाहिलं आहे का? निवडणुकीत फायदा होणार असेल तरच राहुल गांधी मंदिरात देव दर्शनासाठी जातात.
सोनिया गांधी चर्चमध्ये दिसल्या असतील पण त्या कधी मंदिरात गेल्याचे कोणी पाहिले का ? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. निवडणुकीसाठी ते मंदिरात जातील, हातात भगवा, हिरवा झेंडा घेतील पण निवडणुका संपल्या की ते टाकूनही देतील, असा टोलाही दानवे यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना लगावला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.