Lower Panganga Project : 'निम्न पैनगंगा' मुद्दा अधिवेशनात गाजणार; अंबादास दानवे, प्रतिभा धानोरकर लक्षवेधीद्वारे मांडणार!

Nagpur Winter Session : प्रकल्प रद्दच्या मागणीसाठी धरणविरोधी संघर्ष समिती पदाधिकारी आणि माजी आमदार प्रदीप नाईक नागपूरात तळ ठोकून.
Lower Panganga Project
Lower Panganga ProjectSarkarnama
Published on
Updated on

साजीद खान -

Nanded News : बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा यंदाच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याचे दिसत आहे. कारण, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) आणि विधानसभेत प्रतिभा धानोरकर हे लक्षवेधी सूचनेद्वारे पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा मांडणार आहेत.

एवढंच नाहीतर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आणि आमदार सचिन अहिर हे सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणार आहेत. अशी माहिती माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर खडका - खंबाळा येथील बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्प व जमिनीचे भूसंपादन रद्द करण्याच्या मागणीसाठी, किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक आणि विदर्भ-मराठवाडा निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी विरोधी पक्ष नेत्यांसह अन्य पक्षांच्या आमदारांना भेटून निवेदन दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lower Panganga Project
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या समवेत नागपूरला तळ ठोकून आहेत.

निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ मराठवाड्याच्या मध्यभागी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर पैनगंगा नदी पात्रात धरण प्रकल्प विरोधी शेतकऱ्यांच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरू आहेत. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर जरी मावेजा दिला गेला तरीही हे प्रकल्प मान्य नाही, अशी भूमिका बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

चितळे समितीच्या अहवालानुसार हा प्रकल्प उपयोग शून्य असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी केवळ शासन निधीचा चुराडा करण्यासाठी आठ्ठहासी भूमिका घेऊन प्रकल्प रेटत असल्याचा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीने केला आहे.

Lower Panganga Project
Praniti Shinde vs Tanaji Sawant : प्रणिती शिंदे, तानाजी सावंत यांच्यात जुंपली...

या प्रकल्पात या भागातील सुपीक जमिनी कवडीमोल भावात संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे कारस्थान रचले जात आहे. असा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या किनवट,माहूर,घाटंजी आणि आर्णी तालुक्यात ठीक ठिकाणी धरण विरोधी संघर्ष समितीचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहेत,पैनगंगेच्या पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनही केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com