Maratha Reservation News: मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापणार ? आंदोलकांनी आता आपला मोर्चा आमदार-खासदारांकडे वळवला

Dharashiv Politics : आंदोलकांनी खासदार-आमदारांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा दिला
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून मराठा आरक्षणासाठी मंगळवारी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आंदोलकांनी आता मराठा समाजातील स्थानिक खासदार आणि आमदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर आळणी फाटा येथे आंदोलकांनी जवळपास दोन तास रास्ता रोको केला. ढोकी-कळंब रस्त्यावर देवळाली येथेही आंदोलन करण्यात आले. मंत्री, खासदार-आमदारांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला. मराठा मंत्री, खासदार-आमदारांनी आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे.

Maratha Reservation
Parbhani Politics : पंकजा मुंडेंच्या खासगी दौऱ्याला परभणीत ठाकरे गटाचे बळ..

धाराशिवमध्ये सोमवारी पालकमंत्री सावंत यांनी आंदोलकांची भेट घेतली. आरक्षण मिळावे, यासाठी राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारून आंदोलकांनी तानाजी सावंत यांची कोंडी केली होती. यानंतर मंगळवारी ग्रामीण भागासह शहरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील आळणी फाटा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी खासदार-आमदारांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा दिला.

ढोकी येथे प्रमोद देशमुख, संग्राम देशमुख, सतीश वाकुरे (ढोकी), प्रज्वल हुंबे, मुकेश जाधव (देवळाली), शिवाजी बेडके (गोवर्धनवाडी), जीवन कावळे (कावळेवाडी), किशोर शेंडगे (तुगाव) यांनी उपोषण केले. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले.

Edited by - Ganesh Thombare

Maratha Reservation
Yashomati Thakur News : " यशोमती ठाकूरही भाजपच्या वाटेवर होत्या, पण..." ; 'या' महिला खासदाराचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com