CM Shinde On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवार सरकार स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Jalna News : जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
CM Shinde
CM Shinde Sarkarnama

Buldhana News: जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्यावतीने ठिक-ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना मराठा आरक्षण दिल्याशिवार सरकार स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बुलढाण्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

जालन्यातील घटनेची गरज पडल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

CM Shinde
Akola News : मराठा समाज आक्रमक ; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

"जालन्यातील प्रकरणात काही लोक भेटीला गेले होते. पण मराठा समाजाला माहीत आहे की, ते समाजाविषयी किती द्वेष पसरवितात, त्यामुळे त्यांना कोणीही त्या ठिकाणी दाद दिली नाही", असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंसह शरद पवारांना टोला लगावला.

CM Shinde
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी संभाजी पाटील निलंगेकरांना घेराव..

बुलढाण्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याने मोठी चर्चा रंगली होती. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना असा कुठलाही गैरसमज पसरवू नका. देवेंद्र फडणवीस हे लेह लडाख दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत, आता लोक नाराजीच्या चर्चा सुरु करतील. मात्र, असे काही नाही, आमचे सरकार मजबूत आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com