Jalgaon News, 02 Aug : ठाकरेंच्या शिवसेनेचे जळगाव महापालिकेचे नगरसेवक तथा पालिकेचे गटनेते अनंत जोशी यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ओंकारेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. अनंत जोशी यांनी इतकं टोकाचं पाऊल का का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
नुकतंच दहा दिवसांपूर्वीच जोशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर लगेचंच त्यांनी आत्महत्या का केली? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जोशींच्या आत्महत्येची माहिती समजताच शिवसेनेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली.
जोशी हे पहिल्यापासून शिवसेनेत होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच न जाता उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते पक्षात सक्रीय नव्हते.
शिवाय गेल्या काही दिवसांपासून ते कसल्या तरी विवंचनेत होते, मात्र ते असं काही टोकाचे पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं, अशी माहिती ठाकरे गटाच्या एका नेत्यांने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.