
Dharashiv News : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या खांबांना क्रॅक गेले असून त्यासंदर्भात आधीही मंत्रालयात बैठक लावून आढावा मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी घेतला होता. त्यावेळी स्थानिक आमदार, लोकप्रतिनीधी, मंदिर ट्रस्ट यांनी निर्णय घेऊन पुढील उपाययोजनांबाबत माहिती द्या, असे निर्देश दिले होते.
त्यानंतर शनिवारी तुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धन कामाची पाहणी मंत्री आशिष शेलार यांनी केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या. यावेळी तुळजापूरचे भाजपचे (Bjp) आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह भाजपचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ आणि कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले होते. 1993 च्या भूकंपानंतर मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण करण्यात आले होते. मात्र, त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेत तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. मंदिराच्या मूळ स्थापत्य शैलीचं जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारसाच रक्षण या दोन्ही बाबींचा विचार राज्य सरकारने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.