Tuljabhavani Gold News: धक्कादायक ! महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मौल्यवान रत्नं गायब

Tulajapur Temple Gold Stollen: यापूर्वी १९६३, १९७१, २०१२, २०१८ मध्ये दागिन्यांची मोजदाद
Tuljabahvani
TuljabahvaniSarkarnama
Published on
Updated on

Tuljabhavani Devi Priceless Jwellery : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालापासून अनेक दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत. त्याची नेहमी मोजदाद केली जात होती. आता देवीचे शिवकालीन दागिनेच गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दागिने मोजदाद समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आहवाल दिला आहे. या आहवालातून ही माहिती समोर आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवीनी मातेच्या दागिन्यांवर कुणी डल्ला मारला, अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Tuljabahvani
Pankaja Munde Pollitical Breaking : पंकजा मुंडेंना थेट दिल्लीतून सांगावा; 'राजकीय ब्रेक' घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा !

धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवीनी देवीला भाविकांनी अर्पण केलेले अलंकार व दागिन्यांची मोजदाद करण्याचे ठरवले. त्यांनी दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी एक पंच समिती नेमली होती. त्यात अंकाउट ऑफिसर, धार्मिक विधी करणारी मंडळी, नायब तहसीलदार आणि पुजाऱ्यांपैकी काहींचा समावेश करण्यात आला होता. या समितीने देवीला अर्पण केलेल्या १९६६ पासून दागिन्यांची मोजदाद केली. याबाबत मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकाऱ्यांनी २७ पानांचा अहवाल सादर केला आहे. यात देवीचे काही अलंकार गहाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Tuljabahvani
Monsoon Session 2023 : 'आमच्यामुळे हे सरकार आहे; गरज संपत नाही, म्हणून अजित दादा सोबत आलेत ना...'

यापूर्वी देवीच्या अलंकारांची १९६३, १९७१, २०१२, २०१८ मध्ये मोजदाद झालेली होती. यात देवीचे सुमारे २५० किलो सोने आणि चार-पाच हजार किलो चांदी असल्याचे समोर आले. यानंतर नित्योपतारातील शिवकालीन अलंकारांची मोजदाद सुरू केली. यात १ ते ७ क्रमांकांतील सहाव्या डब्यातील सात ते दहा पौराणिक अलंकार गायब असल्याचे स्पष्ट झाले.

यात देवीच्या खडावा, माणिक, पाचू , मोती यांचा समावेश आहे. हे अलंकार कधी गायब झाले, याबाबत माहिती मात्र समोर येत नाही. हा अहवाल अंतरिम असून यावर जिल्हाधिकारी ओंबासे यांनी पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी एका आठवड्याची मुदत दिलेली आहे. यावेळी १९६३ च्या दप्तराशी आताच्या नोंदीची तपासणी केली जाणार आहे.

या मंदिरातील सोने चोरीला गेल्याबाबत 'सीआयडी'ने गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे हे दागिने गायब आहेत की चोरीला गेले आहेत, याबाबत सध्या काही सांगता येत नसल्याचे समितीतील पंचाचे म्हणले आहे. तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या काही अलंकारावर शिवकालाचा, मुघल शासकांचा उल्लखे होता. हे अलंकार अनमोल होते. तेच आता गायब झाल्याने राज्यात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com