Shiv sena UBT News : पक्षाचे शिबीर रद्द करत उद्धव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार!

Marathwada Heavy Rain Relief Fund Demand : उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरीक, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नुकताच दौरा केला. केंद्राकडे मराठवाड्यासाठी व राज्यासाठी विशेष पॅकेजची त्यांनी मागणी केली आहे.
Shiv Sena, Uddhav Thackeray
Shiv Sena, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे शिबीर रद्द करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट मराठवाड्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व त्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकण्यासाठी ठाकरे यांचा हा थेट लढाऊ पवित्रा मानला जात आहे.

  3. या मोर्चामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजण्याची शक्यता आहे.

Marathwada Flood Affected Farmers : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मराठवाड्यात 11 आॅक्टोबरला निष्ठावंत शिवसैनिकांचे शिबीर घेण्यात येणार होते. परंतु मराठवाड्यातील पूर परिस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान या पार्श्वभूमीवर आता हे शिबीर रद्द करण्यात आहे. त्याऐवजी आपत्तग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी मदत न मिळाल्यास मराठवाड्यात आता मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यातील पूर व नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत केली नाही, तर मराठवाड्यात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मराठवाड्यात अतिवृष्टी, पूराने हाहाकार उडाला आहे.

शेती, जनावरे, घरं, पीकं सगळंच वाहून गेले. अनेक भागात तर शेती खरवडून निघाली. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित असताना सत्ताधारी मंत्र्यांचे मात्र फक्त दौरे आणि हवाई पाहणी सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरीक, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नुकताच दौरा केला. केंद्राकडे मराठवाड्यासाठी व राज्यासाठी विशेष पॅकेजची त्यांनी मागणी केली आहे.

Shiv Sena, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : धाराशिवमधील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंचे मोठे आश्वासन; म्हणाले, 'हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...'

सरकारने मराठवाड्याला सापत्न वागणूक देऊ नये, हा महाराष्ट्राचा आणि या देशाचाच एक भाग आहे, हे विसरू नका. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारशी लढायला तयार आहोत. त्यासाठीच मराठवाड्यात मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील.

Shiv Sena, Uddhav Thackeray
Ambadas Danve : मराठवाडा विरोधी सरकारकडून घोषणांचा पाऊस, पण अंमलबजावणीचा दुष्काळ! अंबादास दानवेंचा संताप

सरकारने शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत देऊ केली आहे, ती देखील त्यांच्यापर्यंत पोहचू दिली जाणार नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहे. अशावेळी त्यांच्या पाठीशी उभेराहून असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे. मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे स्वतः करतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. धाराशीवमध्ये शेतकरी रडत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, यावरही राऊत यांनी टीका केली.

FAQs

प्र.1: उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे शिबीर का रद्द केले?
उ. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांचा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी.

प्र.2: हा मोर्चा कुठे आयोजित केला जाणार आहे?
उ. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मोर्चा होणार आहे.

प्र.3: या मोर्चात कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत?
उ. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, पाणीटंचाई, शेतीमालाला हमीभाव यांसारखे मुद्दे मांडले जाणार आहेत.

प्र.4: उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे?
उ. हा निर्णय मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नाराजीला वळण देणारा ठरू शकतो.

प्र.5: या आंदोलनाला जनतेचा किती प्रतिसाद मिळू शकतो?
उ. शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर असल्याने मोठा जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com