Shivsena UBT : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध?

Aditya Thackeray Opposition Leader : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य यांनाच विरोधी पक्षनेते करावं असं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे.
Bhaskar Jadhav, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Bhaskar Jadhav, Aditya Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 01 March : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून (Shivsena UBT) एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य यांनाच विरोधी पक्षनेते करावं असं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे.

महत्वाची बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून पक्षविरोधी वक्तव्य करणाऱ्या आमदार भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) नावाला देखील पक्षातील आमदारांनी विरोध केल्याची सुत्रांची माहिती आहे. ठाकरेंची शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. शुक्रवारी (ता.28) मातोश्री या निवास्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली.

Bhaskar Jadhav, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Mahayuti Leaders Controversial Statements : महायुती सरकारमधील वाचाळवीरांनो...तुम्ही कुठे थांबणार आहात की नाही...?

या बैठकीत पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली. यावेळी काही आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असं ठाकरेंच्या काही नेत्यांचं मत आहे.

शिवाय विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाचे पत्र दिल्यास विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या नावाला कोणतीही अडचण येणार नाही, असं या नेत्यांचं मत आहे. तर दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा आहे.

Bhaskar Jadhav, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा 'कमबॅक'; 'बेल्स पाल्सी'वर मात! मंत्रालयात बैठक, भेटी...

जाधव हे मागील काही दिवसापासून पक्षाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधील बड्या नेत्यांची देखील आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com