Uddhav Thackeray News : हुकूमशाहीला धडा शिकवायचा अजून बाकी; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Political News : आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत तुमच्या मदतीने भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या सोबतची युती तोडली. त्यानंतरही आम्ही २०१९ ला भाजपसोबत गेलो होतो. त्यानंतरही नेहमीच शिवसेनेला संपवण्याची भाषा त्यावेळसपासून भाजपने केली आहे.

आम्ही गद्दारी केल्याने आम्हाला धडा शिकवण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदावर याच मंडळीने खाली खेचले, असे भाजपवाले सांगत असले तरी या हुकूमशाही वृत्तीला अजून आम्ही धडा शिकवायचा बाकी ठेवला आहे. या निवडणुकीत तुमच्या मदतीने भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

(Uddhav Thackeray News)

Uddhav Thackeray
Nitin Gadkari : गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी आमच्याकडे जिंकणारे उमेदवार आहेत !

कळंब येथील शिवसेनेच्या संवाद मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. या वेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

रावसाहेब दानवे मातोश्रीवरील चर्चेत सहभागी झाला होतात का ?

अमित शाह सोबत मी मातोश्रीवरील चर्चेत सहभागी झालो होतो, त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली नव्हती, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी दानवेंना तुम्हाला कोण विचारते. तुम्हे मातोश्रीवर आला असला तरी चर्चेत सहभागी झाला होतात का ? हे सांगा. मी आई-वडील व तुळजाभवानी मातेची शपथ घेतली आहे. कॊणातच खोटारडेपणा केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या निवडणुकीत गद्दारी गाडून टाका

आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. याच दिवशी ओम आणि कैलास दोघेपण आपल्या सोबत आहेत. त्याच निमित्ताने राजकारणातील गद्दारी गाडून टाकण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचं हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चूल पेटवणारे आहे. मात्र, भाजपचं (Bjp) हिंदुत्व मात्र घरे पेटवणारे आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम भाजप करत आहे. सर्व जातीतील धर्मातील लोकांनी एकत्र येऊन, पूर्ण एकजुटीने भाजपच्या हुकूमशाहीला हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. खोक्यावर लाथ मारुन आम्ही खुद्दारीचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. भाई और बहनों असे म्हणत ओम राजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात सोयाबीनचा भाव कितना ? असा सवाल करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धाराशिव दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार कल्पना नरहिरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी कळंब येथे माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. नरहिरे या दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिल्या आहेत.

R

Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : मी लोकांचे फोन घेतो...! मुद्दा छोटा की मोठा? तरीही महायुतीच्या नेत्यांना बेजार करणारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com