Uddhav Thackeray News : पंतप्रधान ज्या काॅलेजमधून शिकले, त्या संस्थेला अभिमान का वाटत नाही : ठाकरेंचा तुफान हल्लाबोल!

Chhatrapati Sambhjainagar news : आम्ही छत्रपतीसंभाजीनगर केलं..
Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray News : Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhjainagar news : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi NewS) संयुक्त सभा होत आहे. या सभेला वज्रमूठ (Vajramuth Sabha) सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "अनेकदा मी इथे छत्रपती संभाजीनगरला आलो. हेच ते मैदान होतं, १९८८ मध्ये पहिल्यांदा संभाजीनगरची महापालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले आजपासून या शहराचं मी नाव बदलतो आहे. आजपासून या शहराचं नाव संभाजीनगर करतो आहे. गेली पंचवीस वर्षे भाजपसोबत आपली युती होती. युतीचं राज्यात आणि केंद्रात दोन वेळा सरकार आलं. पण नामांतर होऊ शकलं नाही. पण मी महाविकास आघाडीच्या माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो कि आपण नामांतर करून दाखवलं."

"भाजपकडून काहीच होत नाही. नुसत्या कोंबड्या झुंजवत बसायचं याचं काम. कोणतेच मुद्दे नाही. आणि यांना प्रश्न विचारायचे नाहीत. सावरकर गोरव काढलं जातंय. काही हरकत नाही. यांनी हिंदू आक्रोश मोर्चा शिवसेना भवनपर्यंत आणला. पण हिंदूंचे सर्वात मोठे नेते मोदी पंतप्रधान असतानाही हिंदूंना आक्रोश करावा लागतो, याची लाज वाटायला पाहिजे," असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधांनांवर केला.

ठमाझ्यावरोती आरोप हिंदुत्व सोडलं. पण मी तुम्हाला विचारतो की, मी कुठे हिंदुत्व सोडलं..आम्ही घटनेचं पूजन करतो. जर शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यामुळे आम्ही हिदुत्व सोडलं असं असेल तर भाजप मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसले, तेव्हा तुम्ही काय सोडलं ? आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही,ठ असा सवाल ठाकरेंनी केला.

"पंतप्रधान मोदींच्या पदवी प्रकरणावरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. आपल्याकडे युवकांना पदवी मिळाली. ते पदवी दाखवतायेत त्यांच्या पदवीला किंमत नाही. मात्र पंतप्रधानाची पदवी विचारलं तर २५ हजार रूपयांचा दंड केला जातो. मी आणि जयंत पाटील एका शाळेत शिकलो. आम्ही बालमोहन शाळेचे विद्या्र्थी. आमच्या शिक्षण संस्थेला आमचा अभिमान वाटतो.पण पंतप्रधान मोदी ज्या काँलेज शिकले, त्या कॉलेज अभिमान का वाटत नाही?" असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com