BJP News : उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा लढलेल्या पराभूत उमेदवारांची भाजपमध्ये घरवापसी!

Defeated candidates from Uddhav Thackeray's party rejoin BJP after the assembly elections. : राजू शिंदे थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले आणि लढले. 1 लाख 35 हजाराहून अधिक मतं घेत त्यांनी शिरसाट यांना चांगली लढत दिली, पण त्यांचा पराभव झाला.
Raju Shinde Shivsena UBT News
Raju Shinde Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : विधानसभेच्या उमेदवारीसाठी किंवा महायुतीत मतदारसंघ आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आलेल्या राज्यातील अनेक भाजपच्या इच्छुकांनी थेट महाविकास आघाडीच्या घटक पक्षात उड्या मारल्या होत्या. तर काही मतदारसंघात स्थानिक कुरघोडीच्या राजकारणातून असे उमेदवार विरोधकांच्या तंबूत पाठवण्यात आले होते. यापैकीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघ.

भाजपचे (BJP) माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती असतांना विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. तेव्हा भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पण अवघ्या दीड-दोन महिन्यात भाजपने पुन्हा त्यांना पक्षात घेतले. 2024 मध्ये पुन्हा संजय शिरसाट यांच्याविरोधात लढण्यासाठी राजू शिंदे थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले आणि लढले.

1 लाख 35 हजाराहून अधिक मतं घेत त्यांनी शिरसाट यांना चांगली लढत दिली, पण त्यांचा पराभव झाला. (Shivsena) आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता भाजपमधील एका गटाला राजू शिंदे पुन्हा पक्षात हवे आहेत. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सुरेश बनकर, वैजापूरचे एकनाथ जाधव या पक्ष सोडून गेलेल्या स्थानिक नेत्यांना भाजपने पुन्हा पक्षात घेतले आहे. त्यानंतर आता राजू शिंदे यांच्यासाठी पक्षातील एक गट आग्रही आहे.

Raju Shinde Shivsena UBT News
Shivsena UBT News : खासदार जाधव, आष्टीकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेला तूर्तास विराम!

राजू शिंदे यांचा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील काही वार्ड, गणामध्ये असलेला प्रभाव पाहता भाजपला त्यांची गरज भासू लागली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात एमआयएमच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे संदीपान भुमरे यांच्याऐवजी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने शिंदे यांच्या घरवापसीत अडथळे निर्माण झाले आहेत.

Raju Shinde Shivsena UBT News
BJP News: महापालिका निवडणुकीत स्वबळ की महायुती..? बावनकुळेंच्या उत्तरानं अजितदादा अन् शिंदेंची धडधड वाढवली

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मानसपूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजू शिंदेंना पक्षात प्रवेश दिला तर महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्वबळाला आणखी बळ मिळेल, असे बोलले जाते. आतापर्यंत चार वेळा पक्ष सोडून गेलेल्या राजू शिंदे यांना आता पुन्हा पक्षात प्रवेश नको, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजू शिंदे यांचे तिकडे मन रमत नाहीये.

Raju Shinde Shivsena UBT News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राजू शिंदे यांनाही त्यांचा जुना पक्ष खुणावतो आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय आपण कार्यकर्त्यांशी घेऊन घेतला होता, आता त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा भाजपमध्ये जायचे का? याचा निर्णय घेणार असल्याचे सांगत शिंद यांनी घरवापसीचे संकेत दिले आहेत. आता भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या प्रवेशाला होणारा विरोध कसा? मोडून काढला जातो यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com