ZP Election : ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, संतापलेल्या पदाधिकाऱ्याने शाईने आंघोळ घालत जाबच विचारला!

Shivsena UBT Politics In ZP Election : राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिच्छेपाट झाली आहे. यानंतरही शिवसेनेनं जिल्हा परिषद निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करत अनेकांना उमेदवारी दिली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena candidate withdrawal; Ambadas Danve
Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena candidate withdrawal; Ambadas Danvesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने परस्पर माघार घेतल्याने वाद निर्माण झाला.

  2. यामुळे संतप्त पक्ष पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारांच्या पतीला जाब विचारत काळी शाई फासल्याचा प्रकार घडला.

  3. या घटनेमुळे निवडणूक प्रचारादरम्यान पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शंभर जागा लढवून सहा नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. परंतू याकडे दुर्लक्ष करत या पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नव्या उमेदीने उडी घेत प्रचाराला सुरूवात केली. पण पक्षाने उमेदवारी दिलेली असताना एका गटातील उमेदवाराने परस्पर माघार घेतल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारांच्या पतीला जाब विचारत काळ्या शाईने अक्षरशः आंघोळ घातली.

पक्षाने एक रुपया न घेता तुम्हाला उमेदवारी दिली, मग तुम्ही पैसे खाऊन माघार कशी घेता? असा संतप्त सवाल करत या उमेदवार पतीला शिवसैनिकांनी धडा शिकवत माफी मागायला लावली.

अधिकृत उमेदवारानेच गद्दारी केल्यामुळे शिल्लेगाव या गटात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आता अडचण झाली आहे. महापालिकेत स्वबळावर लढलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मात्र काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी केली.

Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena candidate withdrawal; Ambadas Danve
pune ZP elections : ZP साठी दुबार मतदारांना द्यावं लागणार हमीपत्र, नेमकं कुठं मतदान करणार आधीच सांगावं लागणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा परिषदेच्या 36 गट आणि ७६ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जालना-छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांनी पक्षाच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले असताना अधिकृत उमेदवारच पळ काढत असल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

गंगापूर तालुक्याचे माजी सभापती सुनील केरे यांच्या पत्नी सविता यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिल्लेगाव येथे उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचे पती सुनील केले यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना विश्वासात न घेता माघार घेतली.

याची माहिती कळताच शिवसेना उपशहरप्रमुख तथा गंगापूर निवडणूक निरीक्षक राजेंद्र दानवे, नंदू लबडे यांनी सुनील केरे यांना गद्दारी बद्दल जाब विचारला. तसेच त्यांना शाईने अंघोळ घालत धडा शिकवला.

Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena candidate withdrawal; Ambadas Danve
ZP Election: झेडपी जिंकण्यासाठी ‘पैशांचा पाऊस’! वारेमाप खर्चामुळे उमेदवारांची दमछाक, कर्जासाठी झिजवताहेत बँकांचे उंबरठे

FAQs :

Q1. संभाजीनगरमध्ये नेमका काय प्रकार घडला?
👉 जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने परस्पर माघार घेतल्याने पक्षात वाद निर्माण झाला.

Q2. काळी शाई ओतण्याचा प्रकार कोणी केला?
👉 संतप्त पक्ष पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारांच्या पतीवर काळी शाई ओतली.

Q3. उमेदवाराने माघार का घेतली याचे कारण स्पष्ट झाले आहे का?
👉 सध्या याबाबत अधिकृत कारण समोर आलेले नाही.

Q4. या घटनेचा पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 अंतर्गत मतभेद उघड झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Q5. पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे का?
👉 या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रारीची माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com