Vaidyanath Sugar Factory : मुंडेंच्या कारखान्यातून निघायचा सोन्याचा धूर; आता 'वैद्यनाथ'चे धुराडे का कोलमडले?

Gopinath Munde And Pankaja Munde : राज्यातील बारा कारखाने चालवणारा 'वैद्यनाथ' कोलमडला
Pankaja Munde, Gopinath Munde
Pankaja Munde, Gopinath MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला परळी येथील वैद्यनाथ कारखाना त्यांनी उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून नावारूपास आणला होता. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना राज्यातील १२ कारखाने चालवीत होता. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्याच्या धुराड्यातून सोन्याचा धूर निघतो, असे बोलले जात होते. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी वैद्यनाथवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. (Latest Political News)

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे १९ कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. या कराची वसुली आणि मालमत्ता जप्तीसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास नोटीस जारी केली आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी राज्यातील उत्तम व्यवस्थापनात या कारखान्याचे नाव घेतले जात होते. त्यामुळे डबघाईला आलेले कारखाना चालण्याची संधी वैद्यनाथ कारखान्याला मिळत होती. वैद्यानाथच्या माध्यमातून माजी मंत्री गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील १२ कारखाने नावारुपास आणले.

Pankaja Munde, Gopinath Munde
Sangli NCP Politics : राष्ट्रवादीच्या दुफळीने ओलांडले घरांचे उंबरठे; सांगलीत 'या' पिता-पुत्रांची विरोधात भूमिका

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कारखाना व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. या काळात कारखान्यावर मोठा कर्जाचा बोजा चढला आहे. कारखान्यावर सुमारे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कारखाना चालवण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगार थकले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी देताना कसरत होते. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत आहेत. आता केंद्र सरकारची सीजीसीएसटीचा भरणा न झाल्याने केवळ १९ कोटी रुपयांसाठी केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली. (Maharashtra Political News)

Pankaja Munde, Gopinath Munde
Bhanudas Murkute Ahmednagar : भानुदास मुरकुटे आजी-माजी मंत्र्यांवर बरसले; म्हणाले, 'सत्तेसाठी विखे-थोरातांची...'

गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वैद्यनाथसह रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पनगेश्वर कारखानाही सुरू केला होता. या कारखान्याचीही अवस्था बिकटच आहे. त्यामुळे या कारखान्याला उर्जित अवस्था देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या काळात पंकजा मुंडे काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे. या कारखान्यावर एकेकळी बी. बी. ठोंबरे व अशोक पालवे या दोन एमडीच्या काळात उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी स्वतःचे कारखाने उभारले आहेत. असे असताना येथील वैद्यनाथला मात्र संजीवनी देता आलेली नाही. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नोटीस ही तात्पुरत्या स्वरूपाची असून या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर जप्तीची कारवाई रोखली जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांना राजकीय वजन वापरून केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागणार आहे. ही जप्तीची कारवाई त्यांना थांबवावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे कारखाना वाचवण्यासाठी भाजपची मदत घेतात का, नाही हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (Beed Politics)

या कारवाईबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, “कारखान्यावरील कर्जाचे जे आकडे सांगितले जातात, ते व्याजाबाबत आहेत. कुठेही काहीही चुकीचे झालेले नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ऊस आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही.”

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde, Gopinath Munde
Malegaon Sakhar Karkhana : अजितदादांना त्यांच्याच स्टाइलमध्ये मदननानांचा खडा सवाल; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com