Beed Crime News : फोनसाठी वादावादी झाली अन् कैदी जमले; पण तिथे कराड, घुले नव्हते! कारागृह प्रशासनाने मारहाण झाल्याचा दावा फेटाळला

Valmik Karad and Sudhir Ghule were not assaulted in jail, as per the police administration. Suresh Dhas' claim of the incident being denied by authorities. : फोनसाठी राजेश वाघमोडे, सुधीर सोनवणे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा इतर कैदी तिथे जमले होते. मात्र यावेळी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते.
Karad-Ghule Attack News
Karad-Ghule Attack NewsSarkarnama
Published on
Updated on

Suresh Dhas News : बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांना बबन गीते समर्थक महादेव गिते व अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याच्या माहितीने एकच खळबळ उडाली. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मारहाण झाल्याचा दावा करत पत्रकार परिषद घेत काही नवे आरोप आणि माहिती दिली. मात्र बीड कारागृह प्रशासनाने कराड, घुले यांना मारहाण झाल्याच्या बातम्या आणि सुरेश धस यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे.

एक वृत्तपत्राला कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दिलेल्या माहितीनसूार फोनसाठी राजेश वाघमोडे, सुधीर सोनवणे यांच्यात वाद झाला होता. (Beed News) या वादाच्यावेळी इतर कैदी तिथे जमले होते. कारागृह प्रशासनाने वेळीच या कैद्यांना बाजूला करत वाद मिटवला. मात्र यावेळी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा केला जाणारा दावा चुकीचा आणि खोटा आहे.

Karad-Ghule Attack News
MLA Suresh Dhas News : डोक्यावर फर कॅप अन् वाढलेली पांढरी दाढी, सुरेश धस यांच्या 'दावत ए इफ्तार' मधील लूकची चर्चा!

बीड कारागृहातून काही कैद्यांना इतरत्र हलवण्यात येणार असल्याबद्दल सांगताना सुपेकर यांनी त्याला दुजोरा दिला. परंतु ज्या कैद्यांना कारागृहातून हलवण्यात येणार आहे, त्यामध्येही वाल्मीक कराड (Walmik Karad) किंवा सुदर्शन घुले यांचे नाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कराड-घुले यांना नेमकी मारहाण झाली की नाही? यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता नाश्त्याच्यावेळी कराड-घुले यांना बबन गीते समर्थक दोघांनी अंगावर धावून जात मारहाण केल्याचे बोलले जात होते.

Karad-Ghule Attack News
Beed : वाल्मिक कराडवरील हल्ल्याचे बबन गित्तेशी कनेक्शन; राईट हँन्ड महादेव गित्तेच्या डोक्यात 8 महिन्यांपासून धुमसत होता राग

आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन बीड कारागृह, तेथील प्रशासन आणि एकूणच बीड पोलीसांच्या कामगिरीवर तोफ डागली होती. परळीतील टोळीयुद्धाचा हा परिणाम असल्याचे सांगत वाल्मीक कराड आणि बबन गीते यांच्या टोळ्यांमधील हा जुना वाद असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर एकमेकांना संपवल्याशिवाय चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मीक कराड तर दाढी काढणार नाही, असा प्रण बबन गीते यांनी केल्याचा दावाही धस यांनी केला होता.

Karad-Ghule Attack News
Walmik Karad News : बीडच्या जेलमध्ये राडा, कराड अन् घुलेला मारहाण

बीड कारागृहात अधिकारी, कर्मचारी मिळून 45 जणांचा स्टाफ आहे. पोलीस अधीक्षकांनी हे शासनाला का कळवले नाही? रिक्त पदे भरण्यासंदर्भात काय प्रयत्न केले? असा सवाल धस यांनी उपस्थितीत केला. याशिवाय बीड जिल्ह्यातील पोलीस, कारागृह यावर चार तासांचा चित्रपट निघू शकेल, अशी टीका केली होती.

Karad-Ghule Attack News
MLA Suresh Dhas News : एक दाढीने महाभारत, त्यात आता सुरेश धसांच्या वाढत्या दाढीची चर्चा!

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र कारागृह प्रशासनाने असे काही घडलेच नाही, असा खुलासा करत धस यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. आता धस यावर काय प्रतिक्रिया देतात? की मग आपल्या दाव्यावर ठाम राहतात? हे पहावे लागेल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com