Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

Mahayuti News : धनंजय मुंडे यांच्या नेत्यांनीही आम्हाला परळीच्या जागेसंदर्भात कुठलाही खुलासा केलेला नाही.
Pankaja Munde- Dhananjay Munde
Pankaja Munde- Dhananjay MundeSarkarnama

Beed News : भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय नाते संपूर्ण राज्याला सर्वश्रूत आहे. पण, अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्याने पंकजा मुंडे यांची अडचण झाली आहे. विशेषतः परळीच्या जागेसंदर्भात काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न असताना पंकजा यांनी आज त्यासंदर्भात मोठे भाष्य केले आहे. (No one discussed with Dhananjay Munde or me in Parli constituency: Pankaja Munde)

भारतीय जनता पक्षाचे नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर आल्या होत्या. त्यावेळी माध्यमाशी बोलताना परळी विधानसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले. त्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde- Dhananjay Munde
Assembly Winter Session : बाळासाहेब थोरातांनी मागणी करताच...मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच करून टाकली

परळी विधानसभा मतदासंघासंदर्भात मी माझी भूमिका अनेकदा स्पष्ट केले आहे. परळीच्या जागेसंदर्भात धनंजय किंवा मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असा मोठा दावा पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर बोलताना केला आहे.

Pankaja Munde- Dhananjay Munde
Solapur Millet Center : बारामतीला निधी द्या; पण मिलेट सेंटर सोलापुरातच उभारा; देशमुख-शिंदेंची सरकारला विधानसभेत विनंती

माझे नेते अमित शहा, केंद्र व राज्यातील आमचे प्रमुख नेते तसेच, धनंजय मुंडे यांच्या नेत्यांनीही आम्हाला परळीच्या जागेसंदर्भात कुठलाही खुलासा केलेला नाही. या जागेसंदर्भात कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. ज्या दिवशी परळीच्या संदर्भातला विषय होईल, त्यावेळी तो तुम्हालाही समजेलच, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा २०१४ च्या निवडणुकीत परळीतून तब्बल २५ हजार ८९६ मतांनी पराभव केला होता. धनंजय मुंडे यांनी त्याचा वचपा काढताना २०१९ च्या निवडणुकीत ३० हजार ७३१ मतांनी पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे दोन्ही नेते बहिण-भाऊ असूनही राजकीय लढाई त्वेषाने लढतात. मात्र, अजित पवार यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने पंकजा मुंडे यांची गोची होण्याची शक्यता आहे.

Pankaja Munde- Dhananjay Munde
Ethanol Production Issue : मोदींना मित्र पक्षाचा घरचा आहेर; ‘इथेनॉल बंदीबाबत पवार-फडणवीसांनी या गोष्टींचा आग्रह करावा’

परळी मतदारसंघातून कोणाला तिकिट द्यायचे, असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांपुढे असणार आहे. आघाडी किंवा युतीच्या आतापर्यंतच्या समीकरणानुसार विद्यमान आमदाराच्या पक्षाला संबंधित जागा सोडण्याचे धोरण आहे. त्यानुसार परळी मतदारसंघ विद्यमान आमदार म्हणून धनंजय मुंडे यांना सुटू शकतो. मात्र, पंकजा मुंडे यांची दावेदारीही तेवढीची भक्कम आहे. त्यामुळे जागा कोणालाही सुटली तरी पुढचा काय निर्णय घेतो, याकडे महायुतीच्या नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. विशेषतः पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना परळीतून लढण्याचे संकेत दिले आहेत.

Pankaja Munde- Dhananjay Munde
Winter Session 2023 : अजितदादांना आता मुख्यमंत्री करा, मी माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी घेतो; शिवसेना नेत्याची ऑफर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com