Walmi Karad : तुरुंगातून बाहेर येण्यासाठी वाल्मिक कराडची धडपड; मकोकाचा जामीन नाकारताच पुढचं पाऊल

Walmi Karad Appeal : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या अपिलाच्या अनुषंगाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांनी शुक्रवारी (ता. 20) दिला आहे.
Walmi Karad
Walmi KaradSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 20 Sep : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या अपिलाच्या अनुषंगाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांनी शुक्रवारी (ता. 20) दिला आहे.

याबाबत सहा ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याची मुदत देखील न्यायलयाने दिली आहे. वाल्मीक कराडने विशेष मोक्का खटल्यात जामीन अर्ज नामंजूर करणाऱ्या आदेशाविरुद्ध खंडपीठात वकील संकेत कुलकर्णी आणि सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत अपील दाखल केले आहे.

अपिलात म्हटलं आहे की, गुन्ह्यात असा आरोप आहे की, कराडने सहआरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि इतरांसोबत खंडणी आणि घातपातासाठी गुन्हेगारी टोळी तयार केली. कराडने सहआरोपींसोबत अवादा एनर्जी पॉवर लि. कंपनीकडून दोन कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला.

Walmi Karad
Nitin Gadkari : आरक्षणा संदर्भात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला...'

खंडणीची मागणी पूर्ण न केल्यास कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर 9 डिसेंबर 2024 ला सहा जणांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निघृणपणे हत्या केली.

Walmi Karad
Maharashtra Politics Video : जयंत पाटील यांच्यावर पक्ष सोडण्याचा दबाव म्हणून पडळकर...', ठाकरेंच्या खासदाराचा मोठा दावा

या सर्व आरोपींविरोधात केज पोलिस ठाण्यात 3 गुन्हे नोंद झाले होते. या गुन्ह्यात 15 जानेवारी 2025 ला कराडला अटक झाली. 21 फेब्रुवारी 2015 ला मोक्काचे कलम दाखल करण्यास परवानगी दिली. तपासाअंती तिन्ही गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 30 ऑगस्ट 2025 ला बीडच्या विशेष न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. या विरोधातच कराडतर्फे खंडपीठात अपील दाखल करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com