Walmik Karad : कराडच्या शरणागतीवर ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांची दोन दिशेला तोंडे; ‘एकाकडून अभिनंदन; दुसऱ्याकडून ताशेरे’

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खून प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. कराड शरण हे पोलिसांचे अपयश आहे, असा सूर लावला जात आहे.
Milind Narvekar- Sushma Andhare
Milind Narvekar- Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 December : संतोष देशमुख खून प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. कराड शरण हे पोलिसांचे अपयश आहे, असा सूर लावला जात आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराने सरकार आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे, तर उपनेत्यांकडून हे पोलिसांचे अपयश आहे, असे म्हटले आहे.

वाल्मिक कराडला (Walmik Karad) पुणे सीआयडीने बीड सीआयडीकडे सोपविले आहे. आता कराडवर बीडमध्ये पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खुनानंतर तब्बल २२ दिवसांनी कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे. तत्पूर्वी कराडच्या अटकेसाठी राज्यभरातून प्रचंड दबाव सरकारवर येत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी कराड हा पोलिसांना शरण आला आहे, त्यामुळे त्याची एकच चर्चा राज्यात सुरू आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय्य साहायक आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तातडीने एक्स अकाउंटवर पोस्ट करत सरकार आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे. नार्वेकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन!’

Milind Narvekar- Sushma Andhare
Walmik Karad Surrender : शरण येण्यापूर्वी तीन दिवस वाल्मिक कराड कुठे होता? संभाजीराजेंनी केले मोठे गौप्यस्फोट

नार्वेकर यांच्या पोस्टने महाविकास आघाडीतील मित्रपक्षातून नाराजी व्यक्त केली आहे. नार्वेकर काहीहरी म्हणू शकतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. देशमुख खूनप्रकरणी एकीकडे सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात असताना नार्वेकरांनी केलेल्या पोस्टने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Milind Narvekar- Sushma Andhare
Santosh Deshmukh Murder : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आव्हाडांना अपेक्षा अन्‌ फडणवीसांचे रोखठोक उत्तर! (Video)

दुसरीकडे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र वाल्मिक कराडच्या शरणागतीवरून पोलिस आणि सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. वाल्मिक कराडची शरणागती म्हणजे सरकार आणि पोलिसांचं नाकर्तेपणे अधोरेखित करणारे आहे. बीडचं वातावरण ‘लॉ’लेस वातावरण आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण गेली चार वर्षांपासून गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांचे अपयश नाही का, असा सवालही अंधारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com