
Mumbai, 31 December : संतोष देशमुख खून प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड हा आज पुण्यात सीआयडीला शरण आला. पुण्याच्या सीआयडीने कराडला बीड सीआयडीकडे सोपवली आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी वाल्मिक कराडबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. शरण येण्यापूर्वी तीन दिवस कराड कुठे होता?, तो आजच शरण कसा आला?, यावर संभाजीराजेंनी भाष्य केले आहे.
शरण येण्यापूर्वीचे तीन दिवस वाल्मिक कराड (Walmik Karad) हा पुण्यातच होता. तो अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आला आहे. पुण्यातील एका टॉप मोस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. या सर्व गोष्टी सीआयडीला समजल्याच कशा नाहीत. सर्वांत महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल बैठक हेाते, त्या बैठकीचा अर्थ काय? आणि आज लगेच वाल्मिक कराड शरण. शरणच यायचं होतं तर अठरा दिवसाच्या आधी व्हायला पाहिजे होतं. आजच तो शरण का आला? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.
ते म्हणाले, वाल्मिक कराड आज शरण येण्याला दोन तीन कारणं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदेश दिल्यानंतर त्याची बॅंक अकाउंट सील झाली. त्याची संपत्ती जप्त करण्यात आली, हा एक आर्थिक दबाव त्यावर आलेला असेल. दुसरं धनंजय मुंडेंनी त्याला काल काय सांगितलं का? की बाबा, महाराष्ट्रात फार आक्रोश निर्माण व्हायला लागला आहे, तुला दुसरा काही पर्याय नाही.
धनंजय मुंडेंचं नाव मी का घेतो, तर संतोष देशमुख खून प्रकरणी चौघांना अटक केली आहे, तर तिघे फरारी आहेत, त्यांचा म्होरक्या म्हणजे हा माणूस (वाल्मिक कराड) आहे. हे मी नाही तर बीडची संपूर्ण जनता म्हणते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच नातं जगजाहीर आहे. खुद्द पंकजा मुंडेंनीही वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानसुद्धा हालत नाही, असे सांगितले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संभाजीराजे म्हणाले, वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा माणूस आहे, असे खुद्द धनंजय मुंडेंनी जाहीरपणे सांगितलेले आहे. धनंजय मुंडेंनी व्यवसायासाठी कराडला वटमुखत्यारपत्र दिलं आहे. एवढे दिवस तो का शरण आले नाही. त्यामागे काहीतरी प्लॅन आहे आणि तो सर्वांसमोर आला पाहिजे. कराडला फक्त खंडणीचा गुन्हा नाही तर मोका कसा लावला जाईल, हे पाहिले पाहिजे.
अजितदादांना माझं आवाहन आहे, तुम्ही देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करून आला हे ठीक आहे. पण तुमची काम करण्याची पद्धत एकदम परखड आहे. आज तो तुमच्याच पक्षाचा आमदार आहे, त्याचे मंत्रिपद काढून घ्या. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांना पालकमंत्रिपद देऊन चालणार नाही. देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यायचा असेल तर मुंडेंचा राजीनामा घ्या, असे आवाहन संभाजीराजेंनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.