Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'एसआयटी'चे प्रमुख बसवराज तेलींचं धस 'कनेक्शन'?

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड याला वर्ग करून घेण्यात आलं आहे. हत्येत तो नववा आरोप ठरला. तसेच त्याचा 'मकोका'मध्ये देखील समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई केल्यानंतर वाल्मिक कराड याचे समर्थक परळीत आक्रमक झाले.
manjili karad  (1).jpg
manjili karad (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरलं आहे.या हत्येप्रकरणी रोज आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण धगधगतं राहिलं आहे.तसेच धक्कादायक खुलाशांनी खळबळ उडवून दिली आहे. यातच पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली नवी एसआयटी स्थापन केल्यानंतर पहिला दणका वाल्मिक कराडला बसला. वाढता दबाव लक्षात घेता याप्रकरणात एसआयटीनं वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्का लावला आहे.

संतोष देशमुख हत्येप्रकरणातील नववा आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवरील मकोका कारवाईनंतर परळीत त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन छेडलं. यात कराड कुटुंबही सहभागी झालं.पण मोक्का लावल्यानंतर संतापलेल्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली यांनी खळबळजनक दावा केला आहे.

पत्नी मंजिली कराड यांनी मंगळवारी(ता.14) माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी 1 जानेवारी रोजी स्थापन केलेली एसआयटी आता बरखास्त करण्यात आली आहे. त्यानंतर जी नवी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे आहेत. त्यांच्याविषयी कराड यांच्या पत्नीनं मोठं विधान केलं आहे.

manjili karad  (1).jpg
Shaktipeeth Mahamarg : फडणवीसांनी 'श्रावणबाळा'चा हट्ट पुरवलाच नाही? 'समृध्दी'नंतर आता ड्रीम प्रोजेक्ट 'शक्तिपीठ' महामार्गावर फोकस

मंजिली कराड म्हणाल्या,सरकारकडून या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या नव्या एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे सुरेश धस (Suresh Dhas) आमदार असलेल्या आष्टीचे जावई आहेत.ते शीतल तेली यांचे पती असून त्या IAS अधिकारी आहेत.एवढ्यावरच न थांबता त्यांनी तेली हे धस यांच्या जवळचे अधिकारी असल्याचा गंभीर आरोपही मंजिली कराड यांनी केला आहे.

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नव्या एसआयटीमधील आठही अधिकारी बदलण्यात यावे अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे. कोणाचेच नातेवाईक या एसआयटीमध्ये असता कामा नये असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामागं आपल्या पतीवर खोटे आरोप करुन एसआयटीचे लोकं काहीही करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

manjili karad  (1).jpg
Dhananjay Munde News : मोठी अपडेट! 'देवगिरी'वरील अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे तातडीनं परळीकडं रवाना

यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे निवडून येण्यासाठी माझ्या पतीनं मदत केली असल्याचं त्यांना दावाही केला आहे. दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला जात असल्याचे मंजिली कराड म्हणाल्या. SIT मधील आठही अधिकारी बदला. कोणाचेच नातेवाईक यामध्ये नसले पाहिजेत अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे. माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करुन SIT चे लोकं काहीही करु शकतात असे त्या म्हणाल्या.

तसेच यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले, त्यावेळी माझे पती परळीमध्ये नव्हते,असा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या पतीचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कोणताही संबंध नाही.मी तुमची माती करेल, असं सुरेश धस यांचं स्टेटमेंट असून बजरंग सोनावणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही कराड यावेळी म्हणाल्या.

manjili karad  (1).jpg
Walmik Karad : परळी 'हायअलर्ट'वर; कराडवरील मोक्का कारवाईनंतर समर्थकानं स्वत:ला पेटवून घेतलं

आमचा वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्याने त्याला दाबण्यासाठी हे सगळं सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमच्या नेत्याना संपवण्यासाठीच हे सगळं सुरु असल्याचंही कराड म्हणाल्या. याचवेळी त्यांनी गरीब वंजारी समाज आणि आमच्या लोकांना उगीच टार्गेट करू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच ज्यांचा खून झाला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे मंजिली कराड म्हणाल्या.त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही.त्यांची एकमेकांना ते ओळखतही नसल्याचा दावा मंजिली कराड यांनी मीडियासमोर केला.

manjili karad  (1).jpg
Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका लागताच अंजली दमानिया यांनी केली ही मागणी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड याला वर्ग करून घेण्यात आलं आहे. हत्येत तो नववा आरोप ठरला. तसेच त्याचा 'मकोका'मध्ये देखील समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई केल्यानंतर वाल्मिक कराड याचे समर्थक परळीत आक्रमक झाले.

याशिवाय वाल्मिक कराड याची आई, पत्नी आणि कुटुंब देखील आक्रमक असून, गेल्या 12 तासांपासून ते पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देऊन आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर SIT ते वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com