Eknath Shinde: आधी ठाकरेंना 'CM' बनण्याचा आशीर्वाद; आता तेच शंकराचार्य म्हणतात,एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरांनी...!

Swami Avimukteshwarananda Saraswati : 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याचा आशीर्वाद देणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आता शिंदेंबाबत मोठं विधान केलं आहे
Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Shankaracharya Avimukteshwaranand SaraswatiSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचं कौतुक:
    शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी गायीला ‘राज्यमाता’ म्हणून जाहीर करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, असं विधान केलं.

  2. उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टीका:
    ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आज पुत्र नव्हे, तर शिष्य चालवत आहे; तसेच राज ठाकरे मुंबई-गुजरात जोडणीवर गप्प का? असा सवालही उपस्थित केला.

  3. हनी ट्रॅप प्रकरणावर आध्यात्मिक प्रतिक्रिया:
    स्वामींनी सांगितले की अशा अनैतिक कृत्यांपासून धर्मच माणसाला वाचवू शकतो; धर्म जीवनात आल्यास कोणीही हनी ट्रॅपमध्ये अडकवू शकणार नाही.

Mumbai News : 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याचा आशीर्वाद देणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल,असं वक्तव्य केलं आहे.(Shankaracharya Swami Avimukteshwaranand lauds Deputy CM Eknath Shinde’s decision to declare the cow as Rajmata, calling it a historic move that deserves to be remembered in golden letters.)

ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक विधानं करताना दिसून येत आहे. कधी ते ठाकरें बंधूंच्या युतीवर,कधी मराठीच्या मुद्द्यांवर,कधी महायुतीवर तर कधी महाविकास आघाडीवरही परखड भाष्य करतात. आता त्यांनी थेट सध्या राज्यात चर्चेत असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर थेट विधानं केली आहेत.

एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर सडकून टीका करत असतानाच दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ( Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj ) यांनी एकनाथ शिंदेंचं प्रचंड कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयावर विरोधकांकडून टीकेची झोडही उठवण्यात आली होती. पण शिंदेंनी विरोधकांचा विरोध झुगारुन आपला निर्णय कायम ठेवला. याचमुळे आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.

ते म्हणाले,एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्णक्षरांनी लिहिले जाईल. जर त्यांच्यासारखे इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही त्यांचाही विचार करू. जे विरोध करतात, ते विरोध करतात, पण काम करणाऱ्याचंच नाव लिहिलं जातं, असंही स्पष्ट मत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केलं.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Bhaskar Jadhav News: भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद का दिलं गेलं नाही? उद्धव ठाकरेंचा बडा नेता सगळंच खरं बोलून गेला

अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणाले,शिंदेंनी प्रवाहाविरोधात जात इतिहासात जे कोणी केले नाही असं काम केलं. गो मातेला पशूंच्या यादीतून हटवून राज्य मातेचा दर्जा दिला. त्याचवेळी आम्हाला वाटले की, गो मातेचा आशीर्वाद या व्यक्तीला मिळेल. निवडणुका जवळ येत गेल्या त्याचप्रमाणे आम्हाला ही गोष्ट समजत गेली. गोमातेने आपला मुलगा एकनाथ शिंदे यांना अशाप्रकारे आशीर्वाद दिल्याचा आनंद असल्याची भावनाही स्वामींनी याठिकाणी बोलून दाखवली.

याचदरम्यान,ज्योतिर्मठ पीठाच्या शंकराचार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही कडवट टीका केली. त्यांनी मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या योजना जिथे बनवल्या जात होत्या,तिथे राज ठाकरे बसले होते का?, असा खोचक सवालही विचारला.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Pune Crime: बॉलिवूड अभिनेत्री अन् माजी क्रिकेटपटूच्या 'फार्महाऊस'वर चोरांनी मारला डल्ला, या गोष्टी पळवल्या

त्यांनी गुजरातमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रात मराठी बोलली जाते.मराठीच्या नावाखाली महाराष्ट्र वेगळा झाला. गुजरात गुजरातीच्या नावाखाली निर्माण झाला.मग आता मराठी मुंबई गुजरातमध्ये कसे जाईल. गुजरात महाराष्ट्रात कसा जाईल असा सवालही त्यांनी विचारला. भाषेच्या नावाखाली गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये झाली. मग हिंदी भाषा सुरू करून तुम्ही मुंबईला गुजरातशी कसे जोडणार? असंही त्यांनी म्हटलं.

शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही महाराष्ट्राच्या जनतेनं प्रेम दिल्याचं म्हणत त्यांना केवळ 20 जागा मिळाल्याचंही सांगितलं. पण एकनाथ शिंदेंना 57 जागा मिळाल्या असून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दलचा विचार आजही जिवंत असल्याचं म्हटलं. पण याचवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आता त्यांचा पुत्र नाही, तर शिष्य चालवत असल्याचंही अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणाले.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Prajwal Revanna rape case : माजी खासदार प्रज्वल रेवण्णाच्या भविष्याचा फैसला 30 जुलैला; बलात्काराच्या चार गुन्ह्यांपैकी एकाचा निकाल लागणार

शिवसेना फुटीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडावरही भाष्य केलं. ते म्हणाले,जोपर्यंत आपण बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहू, तोपर्यंत प्रत्येक तुकडा, मग तो एक असो, दोन असो त्याला शिवसेना म्हटलं जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यातील तब्बल 72 क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली होती. याबाबतही बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठं विधान केलं आहे.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Jayant Patil : थोरल्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जयंतरावांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा!

ते म्हणाले, हनी ट्रॅपपासून तुम्हांला दुसरं तिसरं कोणीही नाही,तर फक्त धर्मच वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धर्म स्वीकाराल,तेव्हा तुम्ही अशा अनैतिक गोष्टींपासून आपोआप दूर राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच एकदा का धर्म तुमच्या जीवनात आला की, कोणीही तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये अडकवू शकणार नाही, असंही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ठणकावून सांगितलं.

प्रश्न 1: शंकराचार्य स्वामींनी एकनाथ शिंदेंबद्दल काय विधान केलं?
उत्तर: गायीला ‘राज्यमाता’ जाहीर केल्याबद्दल त्यांनी शिंदेंचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असं म्हटलं.

प्रश्न 2: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय म्हटलं?
उत्तर: ते म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रेम मिळालं, पण केवळ 20 जागा मिळाल्या.

प्रश्न 3: राज ठाकरे यांच्यावर काय टीका केली गेली?
उत्तर: त्यांनी विचारले की मुंबई-गुजरात जोडणीच्या योजनेवेळी राज ठाकरे कुठे होते?

प्रश्न 4: हनी ट्रॅप प्रकरणावर त्यांचं मत काय आहे?
उत्तर: अशा प्रसंगांपासून वाचण्यासाठी धर्म हाच एकमेव उपाय आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com