Pune News, 26 Oct : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे.
या निवडणुकीत मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भूमिका निर्णय राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटील यांची शनिवारी (ता.26) भेट होणार आहे.
भेटीनंतर या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरा पर्याय निर्माण केला आहे. या महाशक्तीने महाराष्ट्रभरात जवळपास 40 उमेदवार जाहीर केले आहेत.
दोन दिवसांत तब्बल शंभरहून अधिक जागांवर उमेदवार देण्याची तयारी परिवर्तन महाशक्तीने दर्शवली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील (Mahayuti) नाराजांची मोट बांधून ही तिसरी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीचा गणित करत असल्याचं यापूर्वी देखील समोर आलं आहे.
त्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्यात येतील असं बोललं जात आहे. परिवर्तन महाशक्तीच्या निर्मितीपासूनच संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरावं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत यावं असं आवाहन करत आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी देखील ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी उमेदवारांना पाडण्याचं काम करु असं म्हटलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
यासाठी पुण्यातून (Pune) तातडीने विमानाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी येथे ही भेट होणार असून या भेटीमध्ये हे दोन्ही नेते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.