Ambadas Danve : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काल सभागृह डोक्यावर घेणारे विरोधक अचानक आज शांत का झाले? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. (Winter Session) सकाळी कामकाज सुरू होण्याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भजन आंदोलन करत सत्ताराच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
परंतु आज दिवसभरात दोन्ही सभागृहात कर्नाटक सीमाप्रश्नावरील ठराव, पुरवणी मागण्यांवर चर्चा, विधेयक याच कामकाजावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. (Abdul Sattar) गायरान जमीन, कृषी महोत्सवातील वसुलीच्या आरोपावरून विरोधकांनी काल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Shivsena) आज शंभुराज देसाई, संजय राठोड या दोन मंत्र्यांच्या प्रकरणांची देखील यात भर पडली.
तीन मंत्री निशाण्यावर असतांना विरोधक शांत का? या संदर्भात `सरकारनामा` प्रतिनिधीने अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा, आम्ही शांत बसलेलो नाही, उद्या पहा सत्तारांचे काय होते? असा सूचक इशारा दिला. अंबादास दानवे म्हणाले, आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कर्नाटक-सीमा प्रश्नासंदर्भात ठराव घेण्यात आला. यावर सत्ताधारी-विरोधी पक्षाकडून चर्चा करण्यात आली.
राज्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र भूमिका घेण्याचा विषय होता. यात राजकीय विषय आणता येत नाही. या शिवाय लक्षवेधी, विधेयक, पुरवणी मागण्यांवरील चर्चा हे विषय कार्यक्रम पत्रिकेवर होते. त्यामुळे सत्तारांच्या राजीनाम्याचा विषय दोन्ही सभागृहात झाला नाही. परंतु या विषयावर उद्या आम्ही दोन्ही सभागृहात सरकारला जाब विचारणार आहोत. अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.