Beed Womens and Governor News : राज्यपालांना काळे झेंडे दाखवायचा होता प्लॅन; बीडमध्ये पोलिसांनी महिलांना घेतले ताब्यात

Womens wanted show black flags to governor in beed : राज्यातील महिला अत्याचारांच्या मुद्द्यावर राज्यपालांना काळे झेंडे दाखवायचा प्लॅन; बीडमध्ये पोलिसांनी महिलांना घेतले ताब्यात
Beed Womens agitation and Governor Radhakrishnan
Beed Womens agitation and Governor RadhakrishnanSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये महिलांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्लॅन केला. आम्ही केवळ निवेदन द्यायला अलोय असे सांगणाऱ्या माहिलेकडील काळा कपडा पोलिसांना दिसला आणि आंदोलक महिलांसह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन(C.P.Radhakrishnan ) जिल्ह्यातील उद्योजक, सांस्कृतिक, साहित्य आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यात आले होते. छत्रपती संभाजी नगरहून ते हेलिकॉप्टरने येणार होते. मात्र, तांत्रिक कारणांनी त्यांचे हेलिकॉप्टर रद्द झाल्याने राज्यपाल मोटार वाहनाने बीडला आले. त्यामुळे त्यांचा दौरा एक तास उशीरा सुरू झाला.

दरम्यान, राज्यपाल थांबणार असलेल्या शासकीय विश्रामगृहजवळ अ‍ॅड हेमा पिंपळे, राणी शेख, अनिता वाघमारे, मंगल जगताप आदी महिला थांबून होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अत्याचार करणाऱ्या सर्वच आरोपींना फाशी द्या यासह आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली.

Beed Womens agitation and Governor Radhakrishnan
Majalgaon Assembly Constituency 2024 : अजित पवारांची साथ देणाऱ्या सोळंकेंच्या विरोधात शरद पवारांची तुतारी कोण वाजवणार ?

बीडच्या(Beed) रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्याचे निवदेन देणाऱ्या १० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर काही जणांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.

Beed Womens agitation and Governor Radhakrishnan
Bhokardan Assembly Constituency : राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे पुण्यातील मुलाखतीला `लेट`, संधी हुकणार ?

दरम्यान, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अधिकारी, कलावंत, उद्योजक, पत्रकारांशी साधला संवाद साधला. उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले. उस प्रक्रिये प्रमाणे कापूस उद्योग प्रक्रियेला पॅकेज द्यावे, बीड जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नविन उद्योजकांना प्लॉट शिल्लक नाहीत. त्यामुळे नविन व्यवसाय उभा राहत नाही. त्यासाठी जागा द्यावी. उद्योजकांना जीएसटी सोडता इतर कर वगळावेत. वैद्यानिक विकास महामंडळाची स्थापना करावी. आदी प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com