Yogesh Kadam : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना बोलण्याचा हक्क नाही, मंत्री योगेश कदमांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना टोला

Uddhav Thackeray Shiv Sena Sushma Andhare : ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच फाडले, त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका मंत्री कदम यांनी केली.
uddhav thackeray And Yogesh Kadam
uddhav thackeray And Yogesh Kadamsarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र असलेल्या 'बिलाॅगिंग जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांनी तत्कालीन काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेले पानच फाडले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळेच नेते शिंदेंच्या शिवसेनेवर तुटून पडले आहेत. यावर मंत्री योगेश कदम यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाष्य करतांना ठाकरेंच्या नेत्यांना टोला लगावला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फाडले, त्यांना फोटोवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सुनावले.

ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा, असा केला होता याची आठवणही कदम यांनी यावेळी करून दिली. सुषमा अंधारे यांना तर बोलण्याचा नैतिक आधारच नाही. त्यांनी बाळासाहेबांचा पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा असा उल्लेख केला होता. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार कशी दिसते? असं म्हणत ज्यांनी बाळासाहेबांची खिल्ली उडवली होती, त्यांच्याकडून आम्हा शिवसैनिकांना धडा घ्यायची गरज नाही, असेही कदम म्हणाले.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शायना एन.सी. यांनी मनी शंकर आय्यर यांचा फोटो फाडला, बाळासाहेबांचा नाही. तरीही त्यांनी माफी मागितली आहे. हा विषय ज्यांना वाढवायचा आहे ते वाढवत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच फाडले, त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब आमचेच आहे, आम्हीच त्यांचा उदो उदो करतोय, असं दाखवण्याचा प्रयत्न करून राजकारण केलं जात आहे.

uddhav thackeray And Yogesh Kadam
Shinde Shivsena Setback : पालघरमध्ये शिवसेनेला मोठा झटका! माजी आमदार श्रीनिवास वनगा आणि हबीब शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्राच्या मनात काय आहे, मुंबईच्या मनात काय आहे? हे मनपा निवडणुकीतून जनतेच्या समोर आलेले आहे, असेही कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्यांना चाबकाचे फटके दिले पाहिजे, या विधानाला उत्तर देतांना म्हटले आहे.

देशमुखांच्या विधानावर भूमिका स्पष्ट करा..

काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी टीपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे विधान लातूरमध्ये केले आहे. अतिशय निंदनीय अशी ही गोष्ट म्हणावी लागेल. त्यापेक्षा वाईट आहे की, ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना हा प्रश्न विचारा. आम्ही काँग्रेसचे विचार कधी स्वीकारले नाही, आणि स्वीकारणारही नाही. काँग्रेसचे विचार स्वीकारून जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते आजही काँग्रेस सोबत आहेत, आता टीपू सुलतानच्या उदात्तीकरणावर त्यांची नेमकी भूमिका काय? असा सवालही कदम यांनी केला.

शिवसैनिक म्हणून आम्ही उत्तर देऊ

मराठवाड्यात सरकारने दुष्काळात कोणत्याही वित्त संस्था, बँक, फायनान्स कंपनीकडून वसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असताना या कंपन्यांची मराठवाड्यात दादागिरी सुरू आहे. शिवसैनिक म्हणून आम्ही उत्तर देऊ, बाळासाहेबांनी आम्हाला अन्याया विरुद्ध कसे लढायचे? हे शिकवले आहे. जर कोणी गोरगरिबांना त्रास देत असेल, हे फायनान्स वाले ऐकत नसतील तर अशाना आम्ही वेगळ्या भाषेत शिकवू, असा इशाराही कदम यांनी दिला.

uddhav thackeray And Yogesh Kadam
Shiv Sena Case : शिवसेना कोणाची? एकनाथ शिदेंची 'ती' चूक महागात पडणार, कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने धडधड वाढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.