ठाकरेंनी काय दिले विचारता, भुमरे तुम्ही हातापाया पडले आणि त्यांनी मंत्रीपद देवून टाकले..

कितीही खोके वाटले तरी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमली तेवढी गर्दी तुम्हाला जमवता येणार नाही. (Chandrakant Khaire)
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : आदित्य ठाकरेंनी पैठणला काय दिले? त्यांच्या सत्कार कशासाठी करायचा? असा सवाल रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी उपस्थितीत केला होता. त्यानंतर (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमावी म्हणून महिलांना अडीचशे ते तीनशे रुपये दिले जात असल्याची आॅडिओ क्लीप सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भुमरे यांना सुनावले.

असे कितीही खोके रिकामे केले तरी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमली तेवढी गर्दी तुम्हाला जमवता येणार नाही, असा टोला खैरेंनी लगावला. (Marathwada) ठाकरेंनी काय दिले? या टीकेचाही खैरेंनी समाचार घेत भुमरे तुम्ही हातापाया पडले तेव्हा ठाकरेंनी तुम्हाला मंत्रीपद देवून टाकले, असा चिमटा काढला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि जाहीर सभा काही वेळातच भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात होणार आहे. तत्पुर्वीच शिवसेना विरुद्ध भुमरे असा कलगितुरा रंगला आहे. भुमरेंनी पत्रकार परिषद घेवून आदित्य ठाकरे व शिवसेनेवर टीका केली होती. दीड महिन्यात मुख्यमंत्र्यांनी पैठणसाठी दोन हजार कोटींचा निधी दिल्याचे सांगत ठाकरेंनी काय दिले? असा सवाल भुमरे यांनी केला होता.

त्यावर शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमावी म्हणून अंगवाडी सेविकांना गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पत्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केले. आता पैसे देवून महिलांना सभेसाठी आणले जात असल्याची आॅडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. याचाच संदर्भ देत खैरेंनी भुमरे यांच्यावर निशाणा साधला.

Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News
आधी जनतेतून निवडून येऊन दाखवा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन दानवे-भुमरेंमध्ये जुंपली

खैरे म्हणाले, मिळालेल्या ५० खोक्यातून भुमरे पैसे वाटून गर्दी जमवू पाहत आहेत. पण असे कितीही खोके वाटले तरी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमली तेवढी गर्दी तुम्हाला जमवता येणार नाही. ठाकरेंनी काय दिले म्हणून विचारता, त्यांनीच तुम्हाला पाचवेळा आमदार केले, हातापाया पडले म्हणून मंत्रीपदही दिले, अशी टीका खैरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com