Shivsena UBT News : 'सौदा केला, आम्हाला डांबून ठेवलं...', झेडपी सदस्याचा अंबादास दानवेंवर गंभीर आरोप

Sanjay Nikam Ambadas Danve ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंसोबत जाण्यासाठी अंबादास दानवे यांनी आम्हा सगळ्या सदस्यांचा परस्पर सौदा केला, असा गंभीर आरो संजय निकम यांनी केला आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Nikam News : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा सर्व नऊ सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे आदेश दिले. परंतु अंबादास दानवे यांनी परस्पर आमचा सौदा केला. चार दिवस आम्हाला डांबून ठेवलं, आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही, की भाजपाशी हातमिळवणी केली नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंसोबत जाण्यासाठी अंबादास दानवे यांनी आम्हा सगळ्या सदस्यांचा परस्पर सौदा केला. तो कितीमध्ये केला, कसा केला आम्हाला माहित नाही. पक्षाने तटस्थ राहण्याचे आदेश दिलेले असताना अंबादास दानवे यांनी परस्पर इकडे आमचा सौदा करून चार दिवस आम्हाला डांबून ठेवलं. आधी इगतपुरी, नवी मुंबई, ठाणे, कर्जत आणि गोव्याला नेले. तिथे त्यांचा भाऊ, बाॅडीगार्ड हे आमच्यावर लक्ष ठेवायला होते.

अंबादास दानवे यांनी आमच्यावर आम्ही भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप केला आहे, तो धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे. उलट अंबादास दानवे हेच भाजपाच्या संपर्कात होते. गोव्यातून आम्ही गनिमी काव्याने सुटका करून घेतली. मी आणि आमच्या भगिनी सोनवणे आम्ही दानवे यांच्या तावडीतून बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही भाजपाच्या नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात होतो.

Ambadas Danve
Sambhaji Nagar ZP: भाजपनं केसानं गळा कापला! विश्वासघात केला, राज्याच्या राजकारणावर याचे परिणाम होणार; अब्दुल सत्तारांचा निर्वाणीचा इशारा

अंबादास दानवे यांनी आमचा सौदा केल्याचे या नेत्यांच्या कानावर घातले. तेव्हा या सगळ्या नेत्यांनीही आम्हाला पक्षाच्या आदेशा प्रमाणे चला, असे सांगितले. दानवे यांचा डाव आम्ही उधळून लावला, या रागातूनच त्यांनी माझ्यावर आणि सोनवणेताईंवर आरोप केले आहेत, असा दावाही संजय निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आमच्या सदस्यांची सत्तेत जाण्याची इच्छा आहे, असे सांगत अंबादास दानवे यांनी खळबळ उडवून देत वेगळ्या समीकरणांचे संकेत दिले होते. परंतु शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे पक्षाचा हा डाव भाजपाने उलटवला आणि आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आणले.

भाजप-ठाकरेसेनेत आरोप प्रत्यारोप

त्यानंतर भाजपा-शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अब्दुल सत्तार यांनी भाजपाने केसाने गळा कापल्याचा आरोप केला होता. तर अंबादास दानवे यांनी संजय निकम, सोनवेण यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचे सांगितले होते. त्यानंतर संजय निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे यांच्यावरच गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

Ambadas Danve
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com