Nitesh Rane : मंत्री नितेश राणे अडचणीत, अजामीन पात्र वॉरंट जारी, 'ते' प्रकरण भोवणार

Dhargal-Pernem Toll Plaza Case Court : शनिवारी सुनावणी दरम्यान इतर संशयित आरोपी हजर होते. मात्र, नितेश राणे गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी केले.
Nitesh Rane  Dhargal-Pernem Toll Plaza Case Court
Nitesh Rane Dhargal-Pernem Toll Plaza Case Courtsarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane News: मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. धारगळ-पेडणे टोलनाका तोडफोड आणि कर्मचारी मारहाण प्रकरणी राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 2013 मध्ये या टोलनाक्याची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राणे यांच्यासह त्यांच्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोव्याच्या म्हापसा न्यायालयाने राणे .यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

शनिवारी सुनावणी दरम्यान इतर आरोपी हजर होते. मात्र, नितेश राणे गैरहजर राहिल्याने कोर्टाने ही कारवाई केली. आता या खटल्याची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यावेळी नितेश राणे कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.

2013 मध्ये नितेश राणे हे आपल्या तीन सहकाऱ्यांसह प्रवास करत होते. मात्र, सिंधुदुर्ग-गोवा मार्गवरील धारगळ येथेतील टोल नाक्यावर नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा टोल देण्यावर टोल कर्मचाऱ्यांची वाद झाला होता.

या वादामध्ये टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली होती. त्याविरोधात टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.नंतर त्यांची सुटका देखील केली होती. या प्रकरणाची गोव्यातील म्हापसा येथील कोर्टात सुनावणी सुरू होती.

Nitesh Rane  Dhargal-Pernem Toll Plaza Case Court
Mumbai Crime : क्रूरतेची सीमा ओलांडली! पार्किंगच्या वादातून मुंबईत एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारी घटना

या सुनावणी दरम्यान मुख्य संशयित आरोपी नितेश राणे हे वारंवार गैरहजर राहिले होते. तर, इतर संशयित आरोपी मात्र उपस्थित होते. शासकीय कामात व्यग्र असल्याने तसेच इतर कामांमुळे राणे यांना कोर्टात हजर राहता आले नव्हते. मात्र, आता कोर्टाने थेट त्यांच्या विरोधात अटकवाॅरंट जारी केले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीला ते हजर राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी माझगाव कोर्टाने संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी वॉरंट जारी केले होते. तर, कुडाळ कोर्टाने २०२१ च्या एका आंदोलनासंदर्भात नितेश राणेंसह इतर नेत्यांविरुद्ध वॉरंट जारी केले होते.

Nitesh Rane  Dhargal-Pernem Toll Plaza Case Court
Farmer Alert : ...तर 'त्या' शेतकऱ्यांचं 'आधार कार्ड' 5 वर्षांसाठी काळ्या यादीत; कोणताही लाभ मिळणार नाही कृषी विभागाचा मोठा निर्माण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com