Mumbai Crime : क्रूरतेची सीमा ओलांडली! पार्किंगच्या वादातून मुंबईत एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारी घटना

Mumbai crime news parking conflict attack : मुंबईत पार्किंगच्या वादातून एका अल्पवयीन मुलावर क्रूर हल्ला करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
crime news
crime newsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई लोकलमधील हत्येची घटना अजूनही ताजी असतानाच विरारमध्ये पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की एका 15 वर्षीय मुलावर थेट चाकूने जीवघेणा हल्ल्या करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विरार पूर्वेतील कारगिल नगर परिसरातील गणेश चौकाजवळ असलेल्या महाकाली अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. वाहन पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद अधिक तीव्र झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्याचवेळी एका संतप्त व्यक्तीने 15 वर्षीय शहीद शाह याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

crime news
Ritu Tawde : पावसाळी गटारात मुद्दाम पडून कर्मचाऱ्याने आणलं अडचणीत? मुंबईच्या महापौरांना दाट संशय, थेट चौकशीच लावली

हल्ल्यात शहीद गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी विरार पूर्वेतील रेडिएंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलावर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किरकोळ कारणांवरून वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

crime news
Shaktipith Mahamarg : CM फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला महायुतीतूनच विरोध : तिन्ही पक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत विरोधी ठराव समंत

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे विरारमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com