

Mumbai News : मुंबई महापालिकेचा गड कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मैदानात उतरली आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मास्टर प्लॅन आखण्यात येत आहे. त्यानुसारच प्रचाराचे प्लॅनिंग केले जात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी त्यांच्या सोबतीला राज ठाकरेंची मनसे व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे.
मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्ष एकसंध शिवसेनेची सत्ता होती. मात्र, चार वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक गट या निवडणुकीत भाजपसोबत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून भाजप-शिंदेंचा चक्रव्यूह भेदण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 40 शिलेदार मैदानात उतरवले आहेत. या निवडणुकीत ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, आदेश बांदेकर यांच्यासह 40 शिलेदारावर 'मिशन मुंबई'ची धुरा सोपवली आहे.
मुंबई महापलिका निवडुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आदेश बांदेकर यांच्या नावाचा समावेश आहे.
प्रचारासाठी आता शेवटचे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचार आतापासूनच शिगेला पोहचला आहे. प्रत्येक महापालिका व प्रभागानुसार प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून, भाजप-शिंदे गटाची रणनीती धुळीला मिळवण्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी सोबतीला राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे.
त्यातच शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या माध्यमातून महिला मतदारांना आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांना साद घालण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्यांच्या सभेच्या माध्यमातून मुंबईतील महिलांना साद घालण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा असणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची आक्रमक भाषणशैली भाजप आणि शिंदे गटाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या प्रचारसभा रंगतदार ठरणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे :
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव,अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, रवींद्र मिर्लेकर, नितीन पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, लक्ष्मण वाढले, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, सुषमा अंधारे, संजय जाधव, ज्योती ठाकरे, जयश्री शेळके, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, हारुन खान, सिद्धार्थ खरात, वैभव नाईक, आनंद दुबे, अशोक तिवारी, राम साळगावकर, प्रियांका जोशी, अनिश गाढवे यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.