Lok Sabha Election Update : सट्टा बाजारातून निवडणूक निकालावर मोठे संकेत;  'एनडीए' 400 पार जाणार का?

Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केल्यास पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama

Satta Bazar Prediction : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election Update) सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरूवारी थांबणार आहे. पण त्याआधीच निवडणूक विश्लेषकांकडून भाकितं वर्तवली जात आहेत.

काही जण भाजप (BJP) बहुमताचा आकडा एकट्या बळावर गाठणार नाही, असे सांगत आहेत. तर काहीजण भाजप सहज सत्तेत येईल, असा दावा करत आहेत. सट्टा बाजारातही निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उलाढाल सुरू झाली आहे.

सट्टा बाजाराने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणुकीत भाजपचा सहज विजय होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा बाजारातील कल आहे. असे झाल्यास दहा वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद भुषविणारे ते पहिले नेते ठरतील. (Latest Political News)

Rahul Gandhi, Narendra Modi
Yogendra Yadav News : उत्तर प्रदेशात भाजपला फटका, फक्त 40-42 जागा मिळतील; योगेंद्र यादव यांनी सांगितले कारण

400 पार नाही

एनडीएने (NDA) निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. पण हा आकडा तितकासा सोपा नसल्याने विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. सट्टा बाजारातही 400 हून जागा एनडीएला मिळताना दिसत नसल्याचा दावा केला आहे.

‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुंबईतील एका बुकीने बोलताना सांगितले की, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपला मिळणाऱ्या जागा अधिक वाटत होत्या. मात्र, तीन टप्प्यांनंतर हा ट्रेंड बदलला आणि जागा कमी होताना दिसल्या. त्यामुळे भाजपला 295 ते 305 एवढ्या तर काँग्रेसला (Congress) केवळ 55 ते 65 जागा मिळतील, असा दावा केला जात आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Yogendra Yadav News : उत्तर प्रदेशात भाजपला फटका, फक्त 40-42 जागा मिळतील; योगेंद्र यादव यांनी सांगितले कारण

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपला 315 ते 325 जागा आणि काँग्रेसला 45 ते 55 जागा मिळतील, अशी शक्यता सट्टा बाजारात वर्तवली जात होती. तीन टप्प्यानंतर ही शक्यता अनुक्रमे 270 ते 280 आणि 70 ते 80 अशी झाली.

एका बुकीच्या म्हणण्यानुसार, सट्टा बाजारानेही कधीच भाजपच्या 400 पारच्या दाव्याचे समर्थन केले नाही. एवढेच नाही तर सट्टा बाजारात 350 चा आकडाही अशक्य असल्याचे बेटिंग रेटनुसार दिसून येते. सुमारे 8 ते 9 लाख कोटी रुपयांचे बेटिंग निवडणूक निकालावर लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून बेटिंग सुरू असल्याचे या बुकीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात एनडीएला 28 जागा

सट्टा बाजारात राज्यांनुसारही बेटिंग सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एनडीएला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागेल. उत्तर प्रदेशातही भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. राज्यात एनडीएला 64 ते 66 जागाच मिळू शकतात. गुजरातमध्ये मात्र सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, असे भाकित बाजारात वर्तविले जात आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्र आणि काशी यांचे विद्वत्ता आणि संस्कृतीचे नाते'; असे फडणवीस का म्हणाले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com