Sangram Jagtap Death Threat : आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हैद्राबादमध्ये मुसक्या आवळल्या!

Anis Shaikh Arrested : विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जगताप हे हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहेत. त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांसोबत मोर्चा काढला होता.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Sangram Jagtap Death Threat News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी फिर्याद देण्यात आली होती. बुधवारी रात्री आमदार जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेज करून दोन दिवसांत संग्राम जगताप यांना मारणार, अशी धमकी दिली होती. अखेर तीन दिवसानंतर पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणी अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धमकीचा मेसेज करणाऱ्याला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा मूळ बीडचा आहे. अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेने हैद्राबाद येथील निजामाबाद तालुक्यातील धगगी या गावातून आरोपीला अटक केली आहे.

गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव अनिस महमद हनीफ शेख असे आहे. तो मूळ बीड जिल्ह्यातील चकलांबा येथील असून सध्या तो संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगाव संभाजीनगर येथे राहतो. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैद्राबादमधून सापळा रचून अटक केली.

Sangram Jagtap
Pune Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पीडितेने रचली स्टोरी, आरोपी कुरिअर बॉय नसून...

विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जगताप हे हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहेत. त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांसोबत मोर्चा काढला होता.

आमदार जगताप यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळी असल्याची देखील चर्चा झाली होती. शनि शिंगणापूर येथे विशिष्ट समाजाच्या लोकांना विरोध करण्यात आमदार जगताप हे आघाडीवर होते.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वाढलेली जवळीकीमुळे जगताप यांना धमकी मिळत असल्याच्या देखील चर्चा होत्या. जगताप यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता.

Sangram Jagtap
Maharashtra Education Policy : महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com