Pune Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पीडितेने रचली स्टोरी, आरोपी कुरिअर बॉय नसून...

crime News : 48 तासातच पोलिसांच्या 20 पथकाने आरोपी कुरियर बॉयचा शोध घेत मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून या प्रकरणातील पीडितेने स्टोरी रचल्याचे पुढे आले आहे.
Rape Case
Rape Casesarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी धक्कादायक घटना घडली होती. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अभियंता महिलेवर कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केलेल्या नराधमाने बलात्कार केला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. 48 तासातच पोलिसांच्या 20 पथकाने आरोपी कुरियर बॉयचा शोध घेत मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून या प्रकरणातील पीडितेने स्टोरी रचल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपी हा कुरिअर बॉय नसून पीडितेचा बॉयफ्रेंड असल्याचे पुढे आले आहे.

कोंढवा परिसरातील पीडित तरुणीने या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तक्रार दिली होती. या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक ट्विस्ट समोर आले आहे. हा युवक तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचे पोलीस (police) तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत असल्याचे पुढे आले आहे. त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

Rape Case
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-शिंदेंना धसका... घाम फोडणारा मुंबईचा अंदाज समोर!

पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला आहे. कोंढवा परिसरात तिच्या भावासोबत ती राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता, बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यामुळे, तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली अन् आपण कुरिअर बॉय असल्याचे परिसरात भासवले.

Rape Case
Raj- Uddhav Thackeray Alliance: विजयी मेळाव्यात उद्या ठाकरे बंधू एकत्र, भाषणासाठी पहिला नंबर कोणाचा?

पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बळजबरी करणारा युवक तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. त्यावेळी, शारिरीक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. मुलाने संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला. मात्र, तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातून, दोघांमध्ये वाद झाला अन् तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली असल्याचे पुढे आले आहे.

Rape Case
Eknath Shinde : शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा; 2022 मधील बंडाची आठवण अन् तोंडभरून कौतुकही...

दोघांचे कुटुंबीय एकमेकांच्या ओळखीचे

तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत त्या दिवशी फ्लॅटमध्ये असलेला तरुण गेल्या एक दीड वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. एवढच नाही तर दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाची आहेत. त्या 25 वर्षीय तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तो तरुण तिच्या घरी ती एकटी असताना अनेकदा जायचा.

Rape Case
Eknath Shinde : शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा; 2022 मधील बंडाची आठवण अन् तोंडभरून कौतुकही...

सोसायटीच्या गेटवर असलेले सुरक्षा रक्षक येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करुन घेतात. त्यामुळे आपण खरे नाव सांगितल्यास तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजिस्टर चेक केल्यास आपण घरी येऊन गेलो हे उघड होण्याचा धोका त्याला वाटत होता. त्यामुळे, दोघांनी मिळून शक्कल जी होती. प्रत्येकवेळी तो तरुण तो कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा आणि सुरक्षा रक्षकांनी खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची.

Rape Case
Aditya Thackeray statement : दिशा सालियान प्रकरणात दिलासा...आदित्य ठाकरेंची 4 वाक्यांची प्रतिक्रिया अन् थेट मूळ विषयाला हात

या प्रकारानंतर तिच्या मित्राच थेट नाव न घेता एका अनोळखी कुरिअर बॉयने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. ती करण्याआधी स्वत:च्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला, जेणेकरुन पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळू नये. अशारितीने तरुणीनेच खोटी फिर्याद तयार केल्याचं तपासातून पुढे आलं आहे.

Rape Case
NCP News : राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी स्वतःचा एरिया सोडला; घुसखोरी झाल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ

पीडितेच्या तक्रारीनंतर पुणे परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, अखेर हा सगळा बनाव असून तरुणीने स्टोरी रचल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तब्बल 200 पोलिसांच्या टीम पुण्यापासून दिल्लीपर्यंत आरोपीच्या अटकेसाठी कार्यरत केल्या होत्या.

Rape Case
Shiv Sena Politics : नारायण राणे कधीही विसरणार नाहीत असे हे दिवस; काय घडलं, काय घडणार?

तरुणाला लग्नाच्या ठिकाणाहून चौकशीसाठी घेतले ताब्यात

दुसरीकडे पुण्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडाली, त्यातील आरोपी आपणच आहोत याचा त्या तरुणाला पत्ताच नव्हता. गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील त्याच्या ऑफीसमधे काम केले. शुक्रवारी कुटुंबातील एकाचे लग्न असल्याने तो त्या लग्नात सहभागी झाला होता. पोलिसांनी या लग्नाच्या ठिकाणाहून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले अन् घडलेला सगळा प्रकार समोर आला.

Rape Case
BJP fund transfer inquiry : ‘AI’कडून आवाज काढून घेतला? भाजप आमदाराचा निधी थेट बीडला पोचला; नेमकं काय आहे प्रकरण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com